J-K Terror Attack : मोदींच्या कश्मीर दौऱ्याआधी दहशतवाद्यांचा जवानांच्या बसवर हल्ला
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा व्यवस्था वाढवली जात असतानाच जम्मू कश्मिरातील संजुवानमध्ये दहशतवाद्यांनी जवानांच्या एका बसवर हल्ला केला. या घटनेत एक जवान शहीद झाला असून, दहशतवादी हल्ला आणि चकमकीत एकूण ९ जवान जखमी झाले आहेत. या हल्ल्यानंतर जोरदार धुमश्चक्री सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी २४ एप्रिल रोजी जम्मू कश्मीरच्या दौऱ्यावर जाणार आहेत. कश्मिरातील […]
ADVERTISEMENT

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा व्यवस्था वाढवली जात असतानाच जम्मू कश्मिरातील संजुवानमध्ये दहशतवाद्यांनी जवानांच्या एका बसवर हल्ला केला. या घटनेत एक जवान शहीद झाला असून, दहशतवादी हल्ला आणि चकमकीत एकूण ९ जवान जखमी झाले आहेत. या हल्ल्यानंतर जोरदार धुमश्चक्री सुरू आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी २४ एप्रिल रोजी जम्मू कश्मीरच्या दौऱ्यावर जाणार आहेत. कश्मिरातील सांबा जिल्ह्यात पंतप्रधान मोदी जाणार आहेत. राष्ट्रीय पंचायत दिवशी पंतप्रधान मोदी पाली गावात जाणार आहेत असून, त्याआधीच कश्मिरात दहशतवाद्यांनी जवानांच्या बसला लक्ष्य बनवलं.
संजुवानमध्ये चढ्ढा कॅम्पजवळ सकाळी सव्वा चार वाजताच्या सुमारास दहशतवाद्यांनी सीआयएसएफच्या जवानांच्या बसवर हल्ला केला. या बसमधून १५ जवान ड्युटीवर निघाले होते, त्याच वेळी दहशतवाद्यांनी हा हल्ला केला.
या हल्ल्यानंतर सीआयएसएफने तत्काळ प्रत्युत्तर दिलं. त्यानंतर दहशतवाद्यांनी घटनास्थळावरून पोबारा केला. या घटनेत एक लष्करातील अधिकारी शहीद झाल्याची माहिती समोर आली आहे, तर ९ जवान जखमी झाले आहेत.