अमोल कोल्हेंची मुख्य भूमिका असलेल्या ‘Why I Killed Gandhi’ विरोधातील याचिका फेटाळली

मुंबई तक

काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या ‘व्हाय आय किल्ड गांधी’ (Why I Killed Gandhi) चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली. नथुराम गोडसेच्या आयुष्यावर असलेल्या हा चित्रपट महात्मा गांधी पुण्यतिथीला (30 जानेवारी) म्हणजेच रविवारी प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी नथुराम गोडसेची भूमिका साकारलेली आहे. महात्मा गांधीची हत्या करणाऱ्या नथुराम […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या ‘व्हाय आय किल्ड गांधी’ (Why I Killed Gandhi) चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली. नथुराम गोडसेच्या आयुष्यावर असलेल्या हा चित्रपट महात्मा गांधी पुण्यतिथीला (30 जानेवारी) म्हणजेच रविवारी प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी नथुराम गोडसेची भूमिका साकारलेली आहे.

महात्मा गांधीची हत्या करणाऱ्या नथुराम गोडसेवर आधारित व्हाय आय किल्ड गांधी चित्रपट मागील काही दिवसांपासून वादात सापडला आहे. या चित्रपटात भूमिका साकारल्यामुळे राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांच्यावरही टीका झाली होती.

हा चित्रपट रविवारी (30 जानेवारी) लाईमलाईट (LimeLight) या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज झाला असून, या चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती. या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती इंदिरा बॅनर्जी आणि जेके माहेश्वरी यांच्या खंठपीठासमोर सुनावणी झाली.

सिंकदर भेल यांनी वकील अनुज भंडारी यांच्यामार्फत ही याचिका दाखल केली होती. व्हाय आय किल्ड या चित्रपटातून महात्मा गांधींची प्रतिमा हनन करण्याचा प्रयत्न करण्यात आला असून, यामुळे आपल्या आणि देशातील नागरिकांच्या भावना दुखावल्या गेल्या असल्याचं याचिकाकर्त्यांनी याचिकेत म्हटलं होतं.

हे वाचलं का?

    follow whatsapp