सुप्रिया सुळे, आव्हाड म्हणतात; 25 वर्ष ठाकरे सरकार चालेल.. पण याच प्रश्नावर अजित पवार का संतापले?

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

पुणे: ‘राज्यातील ठाकरे सरकार हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्या नेतृत्वात 5 वर्षच नव्हे तर तब्बल 25 वर्ष चालेल.’ असं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी लोकसभेत बोलताना केलं होतं. तर ‘2024 ला देखील हेच सरकार येईल आणि मी उद्धवलाच पुन्हा मुख्यमंत्री करेन. असं पवार साहेबांनी खासगीत सांगितलं होतं.’ असं वक्तव्य NCP चे मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी कालच (9 डिसेंबर) एका जाहीर कार्यक्रमात केलं होतं. पण जेव्हा या दोन्ही वक्तव्यांबाबत राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार (Ajit Pawar) यांना विचारण्यात आलं तेव्हा मात्र ते चांगलेच भडकल्याचं दिसून आले.

पुण्यात कोरोना आढावा बैठकीनंतर ‘मुंबई Tak’च्या प्रतिनिधीने जेव्हा सुप्रिया सुळे आणि जितेंद्र आव्हाड यांच्या 25 वर्ष ठाकरे सरकारबाबत केलेल्या वक्तव्याविषयी अजित पवार यांना सवाल केला तेव्हा ते संतापल्याचे दिसून आले.

मुंबई Tak प्रतिनिधी: सुप्रिया सुळे आणि आव्हाड यांनी असं म्हटलं आहे की, 25 वर्ष ठाकरे सरकारच राहील.. तुमचं काय म्हणणं आहे?

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

अजित पवार: ‘ते त्यांनीच सांगितलंय ना.. मग त्यांनाच विचारा ना.. बाकीचे कोण-कोण काही बोलणार.. ते असे बोलले म्हणून तुमचं काय मत… यावर माझं काही उत्तर नाही. मला माझ्यापुरते प्रश्न विचारत जा. मी त्याची उत्तरं देत जाईन.’ असं अजित पवार यांनी कॅमेऱ्यासमोर सांगितलं.

मात्र, यावेळी अजित पवार हे संतापल्याचं स्पष्टपणे दिसून आलं. त्यामुळे अजित पवारांच्या मनात नेमकं काय चाललं आहे? याविषयी राजकीय वर्तुळात बरीच चर्चा रंगली आहे

ADVERTISEMENT

ठाकरे सरकार 5 नाही 25 वर्ष सरकार चालवून दाखवेल: सुप्रिया सुळे

ADVERTISEMENT

राज्यातील ठाकरे सरकार हे पाच नाही तर पंचवीस वर्ष सरकार चालवेल असं वक्तव्य सुप्रिया सुळे यांनी लोकसभेत केलं आहे. पाहा त्यांचं नेमकं वक्तव्य काय आहे.

‘आम्ही काही महिने तरी सरकार चालवू की नाही, याची तुम्हाला खात्री नव्हती. पण महिनेच नाही तर आम्ही 2 वर्ष पूर्ण केली आहेत. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात.’

‘एवढंच नाही आम्ही 5 वर्षही पूर्ण करु आणि पुढची 25 वर्ष देखील पूर्ण करुन दाखवू. योग्य शासन आणि भ्रष्टाचारमुक्त सरकार म्हणून महाराष्ट्राचं नाव आणखी वर नेऊ याची आम्हाला खात्री आहे.’ असं यावेळी सुप्रिया सुळे म्हणाल्या होत्या.

पवार साहेब खासगीत बोलले, 2024 ला हेच सरकार येईल आणि मी उद्धवलाच मुख्यमंत्री करेन: आव्हाड

दुसरीकडे एका जाहीर कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी देखील अशाच स्वरुपाचं वक्तव्य केलं होतं. पाहा जितेंद्र आव्हाड नेमकं काय म्हणाले होते.

‘ज्या पद्धतीने पवार साहेबांनी.. त्या अर्थी बघायला गेलं तर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फार अंतर नाही. 56 आणि 54 चं अंतर.. दोन जागांचं अंतर फक्त. पण पवार साहेबांनी पुण्यात आपल्या मित्रांसमोर बोलताना सांगितलं की.. हे मी खासगीतील सांगतोय. साहेब म्हणाले की, ‘2024 ला देखील हेच सरकार येईल आणि मी उद्धवलाच पुन्हा मुख्यमंत्री करेन.’ असं वक्तव्य जितेंद्र आव्हाड यांनी केलं होतं.

पवार साहेब खासगीत बोलले, 2024 ला हेच सरकार येईल आणि मी उद्धवलाच मुख्यमंत्री करेन: आव्हाड

त्यामुळे एकीकडे सुप्रिया सुळे, जितेंद्र आव्हाड यांच्यासारखे नेते हे ठाकरे सरकारच्या नेतृत्वात पुढचे 25 वर्ष सत्ता राबविण्यास तयार आहेत. मात्र, याचबाबत अजित पवार यांना विचारलं असता ते मात्र संतापल्याचे दिसून येतात. त्यामुळे राष्ट्रवादीमध्ये नेमकं चाललंय तरी काय? असा सवाल आता या निमित्ताने विचारला जातोय.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT