ठाणे : आईने पाच महिन्याच्या बाळाला पाण्याच्या ड्रममध्ये टाकलं, कारण ऐकून तुम्हालाही बसेल धक्का

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

– विक्रांत चव्हाण, ठाणे प्रतिनिधी

ठाण्याच्या कळवा परिसरातील महात्मा फुले नगरात २५ तारखेला पाण्याच्या प्लास्टिक ड्रममध्ये पाच महिन्याच्या बाळाचा मृतदेह सापडल्यामुळे खळबळ उडाली होती. या प्रकरणात आईने आपल्या बाळाचं अपहरण झाल्याची तक्रार पोलिसांत दिली होती. परंतू तपासाअंती आईनेच आपल्या बाळाला पाण्याच्या ड्रममध्ये टाकल्याचं उघड झालंय.

२४ डिसेंबरला शांताबाई शंकर चव्हाण यांनी कळवा पोलीस ठाण्यात राहत्या घरातून आपल्या बाळाचं अपहरण केल्याची तक्रार दिली होती. ज्यानंतर पोलिसांनी तात्काळ तपासाला सुरुवात केली. २५ तारखेला तपासादरम्यान पोलिसांना घराच्या शेजारीच असलेल्या पाण्याच्या ड्रममध्ये मुलाचा मृतदेह सापडला. पोलिसांनी बाळाचा मृतदेह ताब्यात घेऊन कळवा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवला. यानंतर तपासाची सूत्र वेगाने हलवत अवघ्या २४ तासांत पोलिसांनी बाळाच्या हत्येचा खरा आरोपी शोधून काढला. खुद्द शांताबाईंनीच आपल्या बाळाला ड्रममध्ये टाकल्याचं उघड झालं आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

NCB चे अधिकारी असल्याचं भासवत खंडणीसाठी दबाव, भोजपूरी अभिनेत्रीची आत्महत्या; दोन आरोपी अटकेत

बाळाचा मृतदेह ज्या दिवशी पोलिसांना मिळाला त्यावेळी अज्ञात आरोपीने हे कृत्य करुन पुरावे नष्ट करण्यासाठी मृतदेह पाण्याच्या ड्रममध्ये टाकला असावा असा पोलिसांना संशय होता. परंतू पोलिसांकडे कोणतेही तांत्रिक पुरावे नसल्यामुळे तपासात अडचण येत होती. परंतू यादरम्यान आईच्या चेहऱ्यावरील हावभाव आणि तिच्या संशयास्पद हालचाली पाहता पोलिसांचा संशय बळावला.

ADVERTISEMENT

पोल्ट्री फार्मसाठी घेतलेलं कर्ज फेडण्यासाठी सराफाचं दुकान लुटलं, वाशिममधील ‘त्या’ घटनेचं गुढ उकललं

ADVERTISEMENT

यानंतर पोलिसांनी शांताबाई यांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता धक्कादायक माहिती समोर आली. शांताबाई यांनी बाळाला खोकल्याचं औषध दिलं होतं. ज्याचा ओव्हरडोस झाल्यामुळे बाळाची तब्येत अचानक बिघडली. बाळ कुठलीही हालचाल करत नाही म्हणून घाबरलेल्या शांताबाईंनी बाळाच्या अपहरणाचा बनाव रचत त्याला पाण्याच्या ड्रममध्ये टाकल्याचं उघड झालं. बाळाचा मृत्यू हा औषधाचा ओव्हरडोस झाल्यामुळे झाला की पाण्याच्या ड्रममध्ये टाकल्यामुळे याचा निष्कर्ष शवविच्छेदनाचा अहवाल आल्यानंतर समोर येईल अशी माहिती पोलीस उपायुक्त अविनाश आंबुरे यांनी दिली.

डोंबिवली: भर रस्त्यात गळ्यावर चाकू लावत बॅंक मॅनेजरला लुटलं, भुरटे चोर CCTV मध्ये कैद

    follow whatsapp

    ADVERTISEMENT