महाराष्ट्रातील अनेक भागात गारपीट; औरंगाबाद, अकोला, अहमदनगर, वाशिमला तडाखा

मुंबई तक

हवामाने विभागाने व्यक्त केलेल्या अंदाजाप्रमाणे राज्यातील काही भागात मुसळधार पावसासह गारपीट झाली. मराठवाड्यातील औरंगाबाद, विदर्भातील वाशिम, तर मध्य महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यात गारपिटीसह पाऊस झाला. यामुळे शेतकऱ्यांच्या द्राक्ष, कांदा, गहू, हरभरा पिकांना फटका बसला असून, मोठं नुकसान झालं असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. वातावरणातील बदलामुळे महाराष्ट्रासह मध्य प्रदेश, छत्तीसगढ झारखंड राज्यांमध्ये 28 ते 30 डिसेंबर […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
google news

हवामाने विभागाने व्यक्त केलेल्या अंदाजाप्रमाणे राज्यातील काही भागात मुसळधार पावसासह गारपीट झाली. मराठवाड्यातील औरंगाबाद, विदर्भातील वाशिम, तर मध्य महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यात गारपिटीसह पाऊस झाला. यामुळे शेतकऱ्यांच्या द्राक्ष, कांदा, गहू, हरभरा पिकांना फटका बसला असून, मोठं नुकसान झालं असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

वातावरणातील बदलामुळे महाराष्ट्रासह मध्य प्रदेश, छत्तीसगढ झारखंड राज्यांमध्ये 28 ते 30 डिसेंबर दरम्यान गारपिटीसह मध्यम पावसाचा इशारा हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आलेला आहे. दरम्यान, राज्यातील काही भागात आज मुसळधार पावसासह गारपीट झाली.

अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर, नेवासा तालुक्यात जोराच्या गारांसह पाऊस झाला. गोदावरी नदीच्या काठावरील गावांना याचा फटका बसल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. गारपीट आणि वादळी पावसामुळे द्राक्ष, कांदा, गहू हरबरा पिकांना फटका बसला असून, अचानक झालेल्या गारपीटीने शेतकरी हवालदिल झाला आहे.

हे वाचलं का?