Maharashtra Bandh: ‘बंद’मध्ये आम्हाला खेचू नका म्हणणारे व्यापारी देखील होणार बंदमध्ये सहभागी!

मुंबई तक

लखीमपूर खिरी येथे झालेल्या हत्यांकाडाविरुद्ध महाराष्ट्रात उद्या (11 ऑक्टोबर) महाविकास आघाडी सरकारने महाराष्ट्र बंदची घोषणा केली आहे. शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांनी पक्षीय पातळीवर महाराष्ट्र बंदची घोषणा दिली आहे. सुरुवातीला या बंदला व्यापारी वर्गातून विरोध सुरु होता. पण आता व्यापारी वर्ग देखील या बंदमध्ये सहभागी होणार आहे. नुकतीच याबाबतची माहिती मुंबई […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

लखीमपूर खिरी येथे झालेल्या हत्यांकाडाविरुद्ध महाराष्ट्रात उद्या (11 ऑक्टोबर) महाविकास आघाडी सरकारने महाराष्ट्र बंदची घोषणा केली आहे. शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांनी पक्षीय पातळीवर महाराष्ट्र बंदची घोषणा दिली आहे. सुरुवातीला या बंदला व्यापारी वर्गातून विरोध सुरु होता. पण आता व्यापारी वर्ग देखील या बंदमध्ये सहभागी होणार आहे.

नुकतीच याबाबतची माहिती मुंबई व्यापारी संघाचे अध्यक्ष विरेन शहा यांनी दिली आहे. शेतकऱ्यांना आमचा पाठिंबा आहे, पण बंदमध्ये दुकानदारांचा खेचू नका असं आवाहन विरेन शहा यांनी केलं होतं. मात्र, आता थोड्या वेळापूर्वीच त्यांनी जाहीर केलं की, उद्याच्या बंदमध्ये सर्व व्यापारी वर्ग हे दुपारी 4 वाजेपर्यंत बंदमध्ये सहभागी होणार आहेत.

‘महाराष्ट्र बंद’मध्ये व्यापारीही होणार सहभागी!

शेतकऱ्यांना आमचा पाठिंबा आहे, पण उद्या सर्व दुकानं सुरुच राहतील. आम्ही सरकारला आवाहन करतो की या बंदमध्ये दुकानदारांचा खेचू नका. कोरोनानंतर बऱ्याच कालावधीने दुकानं सुरु झाली आहेत. सध्या नोकरांना वेळच्या वेळी पगार देणं जिकरीचं होऊन बसलं आहे. शेतकऱ्यांना आमचा नेहमीच पाठिंबा असेल अशी भूमिका विरेन शहा यांनी घेतली होती.

हे वाचलं का?

    follow whatsapp