स्पेलिंग चुकली अन् कंपनीने वर्षभरातील बिअर महिन्याभरातच विकली!

एका बिअर कंपनीने आपल्या चुकीचं देखील अशा पद्धतीने मार्केटिंग केलं की, ज्यामुळे त्याचा कोट्यवधी रुपयांचा फायदा झाला. जाणून घ्या नेमकं प्रकरण काय.
tres cruces beer 1 crore liters sold in a month brand spelling mistake lucky draw prize
tres cruces beer 1 crore liters sold in a month brand spelling mistake lucky draw prize(प्रातिनिधिक फोटो)

असं म्हणतात की, तुमचं एक चूकही महागात पडू शकते. पण एका बिअर (Beer)कंपनीकडून झालेली एक चूक ही त्यांना कोट्यवधी रुपयांचा फायदा देऊन गेली आहे. एका चुकीमुळे कंपनीने एका महिन्यात तब्बल एक कोटी लिटरपेक्षा (1 Crore Liters Beers)जास्त बिअरची विक्री केली आहे.

नेमकी चूक काय?

Heineken-मालकीचा बिअर ब्रँड Tres Cruces गेल्या वर्षी पेरूमध्ये (Peru) लाँच करण्यात आला होता. लाँचच्या अगोदर, कंपनीने पेरूमधील किरकोळ विक्रेत्यांना तीन लाखांहून अधिक बिअर कॅन पाठवले. यावेळी बिअरच्या पॅकेजिंगवर कंपनीचे स्लोगन 'Disfrute' लिहिलेले होते. 'Disfrute' हा स्पॅनिश शब्द आहे, ज्याचा अर्थ आनंद आहे. मात्र किरकोळ विक्रेत्यांना कॅन पाठवल्यानंतर ‘Disfrute’मधून 'S' गायब असल्याचे कंपनीच्या लक्षात आले. ही चूक छपाईच्या वेळी झाल असल्याचं कंपनीच्या निदर्शनास आलं. पण झालेल्या या चुकीमुळे अजिबात विचलित न होता कंपनीने एक मोठा निर्णय घेतला.

1 कोटी लिटर बिअरची विक्री

‘Disfrute’ हा कंपनीचा लोगो आहे, जो बिअर कॅनवर चुकीच्या पद्धतीने छापण्यात आला होता. ब्रँड लॉन्च करतानाच एवढी मोठी चूक कंपनीला भारी पडू शकते. हे कंपनीला लक्षात आलं. अशावेळी तीन लाख कॅन परत मागवण्याऐवजी कंपनीने एक नवी शक्कल लढवली. कंपनीने या चुकीचे रूपांतर लकी ड्रॉच्या गेममध्ये केले आणि या गेममुळे कंपनीने एका महिन्यात तब्बल एक लाख लिटरहून अधिक बिअरची विक्री केली.

कंपनीने सुरू केला लकी ड्रॉ

आपली चूक लपवण्यासाठी कंपनीने ग्राहकांना सांगितले की, त्यांच्या काही बिअरच्या कॅनमध्ये जाणूनबुजून स्पेलिंग चूक केली आहे. एखाद्या ग्राहकाला बिअरच्या कॅनवर स्पेलिंगची चूक सापडल्यास त्याला कंपनीकडून बक्षीस जिंकण्याची संधी दिली जाईल. कंपनीने या ऑफरसाठी 1 एप्रिल ते 20 एप्रिल ही तारीख निश्चित केली आहे. यानंतर Tres Cruces बिअरच्या कॅनची तुफान विक्री झाली.

विजेत्यांना मिळालं बक्षीस

कंपनीने ग्राहकांना सांगितले की, जर तुम्हाला स्पेलिंग मिस्टेक असलेला बिअर कॅन मिळाला तर तुम्ही फोटोसह कंपनीच्या वेबसाइटवर अपलोड करू शकता. बिअर कॅनच्या तळाशी एक कोड छापलेला आहे. कंपनीने त्या कोडसह स्पेलिंग मिस्टेकचा फोटो अपलोड करण्यास सांगितले होते. मे महिन्यात, कंपनीने लकी ड्रॉद्वारे विजेत्यांची घोषणा केली आणि त्यांना 'S' ने सुरू होणाऱ्या भेटवस्तू दिल्या. यामध्ये स्पीकर, स्मार्टवॉच, स्कूटर आणि Tres Crucesचा सिक्स पॅक यांचा समावेश होता.

tres cruces beer 1 crore liters sold in a month brand spelling mistake lucky draw prize
बायकोने फक्त सांगितलं दारु पिऊ नका.. वाचा नवऱ्याने नेमकं काय केलं!

कॅम्पेन ठरलं यशस्वी!

एका रिपोर्टनुसार Tres Crucesची ही मोहीम बऱ्यापैकी यशस्वी ठरली असल्याचं म्हटलं आहे. बक्षीस जिंकण्याच्या लालसेपोटी लोकांनी एप्रिलमध्ये बिअरची तुफान खरेदी केली आणि कंपनीने विक्रमी विक्री केली. Tres Cruces ने एप्रिल महिन्यात 1 कोटी लिटरहून अधिक बिअरची विक्री केली. खरंतर कंपनी एका वर्षात बिअरची एवढी विक्री करते.

Related Stories

No stories found.
logo
Mumbai Tak
www.mumbaitak.in