पवारांच्या आक्षेपांवर कृषीमंत्री म्हणाले, तुमच्याकडे चुकीची माहिती
कृषी कायद्यांवरून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि माजी कृषीमंत्री शरद पवार यांच्यावर केंद्रीय मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी पलटवार केलाय. शरद पवार हे अनुभवी नेते आहेत. पण कृषी कायद्यांबद्दल त्यांना चुकीची माहिती देण्यात आलीय, असं तोमर म्हणाले. शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने आणलेल्या कृषी कायद्यांवर आक्षेप घेत ट्विटरवर आपली भूमिका स्पष्ट केली होती. […]
ADVERTISEMENT

कृषी कायद्यांवरून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि माजी कृषीमंत्री शरद पवार यांच्यावर केंद्रीय मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी पलटवार केलाय. शरद पवार हे अनुभवी नेते आहेत. पण कृषी कायद्यांबद्दल त्यांना चुकीची माहिती देण्यात आलीय, असं तोमर म्हणाले.
शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने आणलेल्या कृषी कायद्यांवर आक्षेप घेत ट्विटरवर आपली भूमिका स्पष्ट केली होती. तोमर यांनी रविवारी पवारांच्या याच आक्षेपांवर ट्विटवरून आपलं मत मांडलं.
पवारांच्या याच ट्विटकडे इशारा करत तोमर म्हणाले, ‘शरद पवार एक ज्येष्ठ नेते आहेत. मला वाटतं की त्यांच्याकडे चुकीच्या पद्धतीने माहिती सादर करण्यात आलीय. आता जेव्हा त्यांना खरी माहिती देण्यात आलीय. तेव्हा ते कृषी सुधारणांबद्दलच्या आपल्या भूमिकेत बदल करतील आणि शेतकऱ्यांनाही याची माहिती देतील.’