Omicron : ब्रिटननंतर अमेरिकेत ओमिक्रॉनमुळे पहिला मृत्यू; भारतातील स्थिती काय?
कोरोनाच्या ओमिक्रॉन व्हेरिएंटने अनेक देशांची चिंता वाढवली आहे. डेल्टापेक्षा ओमिक्रॉनच्या संसर्गाचा वेग जास्त असला तरी तितका धोकादायक नसल्याचं आतापर्यंतच्या अभ्यासातून तज्ज्ञांकडून सांगण्यात आलं आहे. मात्र, आता अमेरिकेत ओमिक्रॉनमुळे पहिला मृत्यू नोंदवण्यात आला आहे. यापूर्वी ब्रिटनमध्येही एकाचा मृत्यू झाला होता. दरम्यान, भारतातील रुग्णसंख्याही वेगाने वाढत असून, एकूण रुग्णसंख्या 172 वर पोहोचली आहे. ओमिक्रॉन व्हेरिएंट अनेक देशांमध्ये […]
ADVERTISEMENT

कोरोनाच्या ओमिक्रॉन व्हेरिएंटने अनेक देशांची चिंता वाढवली आहे. डेल्टापेक्षा ओमिक्रॉनच्या संसर्गाचा वेग जास्त असला तरी तितका धोकादायक नसल्याचं आतापर्यंतच्या अभ्यासातून तज्ज्ञांकडून सांगण्यात आलं आहे. मात्र, आता अमेरिकेत ओमिक्रॉनमुळे पहिला मृत्यू नोंदवण्यात आला आहे. यापूर्वी ब्रिटनमध्येही एकाचा मृत्यू झाला होता. दरम्यान, भारतातील रुग्णसंख्याही वेगाने वाढत असून, एकूण रुग्णसंख्या 172 वर पोहोचली आहे.
ओमिक्रॉन व्हेरिएंट अनेक देशांमध्ये पसरत असतानाच काही दिवसांपूर्वी ब्रिटनमध्ये एकाचा या व्हेरिएंटमुळे मृत्यू झाल्याची नोंद झाली. ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी ही माहिती दिली होती. आतापर्यंत ब्रिटनमध्ये 12 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. ब्रिटननंतर आता अमेरिकेतही ओमिक्रॉनने पहिला बळी घेतला आहे.
Covid 19 : महाराष्ट्रात 544 नव्या रूग्णांचं निदान, ओमिक्रॉनचा दिवसभरात एकही रूग्ण नाही
हॅरिस कंट्री हेल्थ डिपार्टमेंटने दिलेल्या माहितीप्रमाणमे अमेरिकेतील टेक्सासमध्ये ओमिक्रॉन व्हेरिएंटशी संबंधित एका रुग्णाचा सोमवारी मृत्यू झाला. या व्यक्तीचं वय 50 ते 60 वर्षाच्या दरम्यान असून, त्या व्यक्तीने लस घेतलेली नव्हती, असं आरोग्य विभागाने म्हटलं आहे. दुसरीकडे अमेरिकेच्या साथरोग नियंत्रण आणि प्रतिबंधक केंद्राने यावर लगेच भाष्य करणं टाळलं आहे.