पोल्ट्री फार्मसाठी घेतलेलं कर्ज फेडण्यासाठी सराफाचं दुकान लुटलं, वाशिममधील ‘त्या’ घटनेचं गुढ उकललं
– ज़का खान, वाशिम प्रतिनिधी वाशिम जिल्ह्यातील एका सराफाच्या दुकानावर हल्ला करुन दरोडा टाकण्यात आला होता. याचा उलगडा पोलिसांनी काही तासांमध्ये केला आहे. पोलिसांनी या हल्ल्याप्रकरणी दोन आरोपींना जेरबंद केलं असून पोल्ट्री फार्मसाठी घेतलेलं १२ लाखांचं कर्ज फेडण्यासाठी आरोपींनी हा हल्ला केल्याचं तपासात समोर आलंय. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २१ डिसेंबरला मालेगाव शहरातील अंजनकर ज्वेलर्सचे मालक […]
ADVERTISEMENT

– ज़का खान, वाशिम प्रतिनिधी
वाशिम जिल्ह्यातील एका सराफाच्या दुकानावर हल्ला करुन दरोडा टाकण्यात आला होता. याचा उलगडा पोलिसांनी काही तासांमध्ये केला आहे. पोलिसांनी या हल्ल्याप्रकरणी दोन आरोपींना जेरबंद केलं असून पोल्ट्री फार्मसाठी घेतलेलं १२ लाखांचं कर्ज फेडण्यासाठी आरोपींनी हा हल्ला केल्याचं तपासात समोर आलंय.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २१ डिसेंबरला मालेगाव शहरातील अंजनकर ज्वेलर्सचे मालक योगेश अंजनकर व त्यांचे सहकारी कामगार रवींद्र वाळेकर हे रात्री दुकान बंद करून घरी जात होते. त्यावेळी अज्ञात दरोडेखोरांनी त्यांच्याकडील बॅग लंपास करण्यासाठी गाडी अडवून योगेश अंजनकर आणि रवींद्र वाळेकर यांच्या डोळ्यात मिरची पूड फेकली. त्यानंतर आरोपींनी दोघांवरही चाकूने वार केले व देशी कट्टा मधून गोळीबार केला. या हल्ल्यात योगेश अंजनकर आणि वाळेकर हे गंभीर जखमी झाले होते.
कोंबड्या फक्त भाईच्या दुकानातून घ्यायच्या ! कल्याणमध्ये अज्ञात व्यक्तींची चिकन सेंटर मालकाला मारहाण