Rahul Gandhi : “नरेंद्र मोदींना घाबरत नाही” यंग इंडियाचं ऑफिस सील केल्यानंतर प्रतिक्रिया

मुंबई तक

यंग इंडियाचं कार्यालय बुधवारी सील करण्यात आलं. नॅशनल हेराल्ड प्रकरणात ही कारवाई करण्यात आली. त्यानंतर आता काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि खासदार राहुल गांधी यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. नरेंद्र मोदी यांना घाबरत नाही त्यांनी हवं ते करावं मी माझं काम करत राहणार अशी प्रतिक्रिया राहुल गांधी यांनी दिली आहे. राहुल गांधी यांनी यंग इंडियाचं ऑफिस […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

यंग इंडियाचं कार्यालय बुधवारी सील करण्यात आलं. नॅशनल हेराल्ड प्रकरणात ही कारवाई करण्यात आली. त्यानंतर आता काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि खासदार राहुल गांधी यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. नरेंद्र मोदी यांना घाबरत नाही त्यांनी हवं ते करावं मी माझं काम करत राहणार अशी प्रतिक्रिया राहुल गांधी यांनी दिली आहे.

राहुल गांधी यांनी यंग इंडियाचं ऑफिस सील केल्यानंतर नेमकं काय म्हटलं आहे?

काँग्रेसचं मुखपत्र असलेल्या नॅशनल हेराल्ड प्रकरणात हेराल्ड हाऊस इमारतीतल्या यंग इंडियाच्या कार्यालय सील केलं आहे. या कारवाईबाबत राहुल गांधी यांना प्रतिक्रिया विचारण्यात आली. त्यावेळी राहुल गांधी यांनी आपण नरेंद्र मोदींना घाबरत नसल्याचं म्हटलं आहे.

ईडीने मंगळवारी हेराल्ड हाऊसवर छापे टाकले होते. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी यंग इंडियाचं कार्यालयात सील करण्यात आलं. तसंच हे कार्यालय संमती न घेता उघडू नये असाही आदेश काढण्यात आला. हेराल्ड हाऊससह अकबर रोडवर असलेल्या सोनिया गांधी यांच्या दहा जनपथ निवासस्थान, तसंच शेजारी असलेल्या काँग्रेसच्या मुख्यालयाभोवती पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली. अकबर रोडच्या जवळ असलेल्या रस्त्यांची नाकाबंदी करण्यात आली. काँग्रेसचे माध्यम विभागाचे प्रमुख आणि खासदार जयराम रमेश यांनी काँग्रेस मुख्यालयाला गराडा छावणीचं स्वरूप आल्याची टीका केली.

यंग इंडियाचं कार्यालय सील झाल्यानंतर राहुल गांधींची नरेंद्र मोदींवर टीका

“हा सगळा धमकावण्याचा प्रयत्न आहे. त्यांना वाटतं की थोडा दबाव टाकून हे गप्प बसतील. मात्र आम्ही गप्प बसणार नाही. या देशात लोकशाहीविरोधात नरेंद्र मोदी आणि अमित शाह जे काही करत आहेत त्याविरोधात आम्ही उभे राहणार आहोत. त्यांनी काहीही केलं तरीही आम्ही ठामपणे उभे राहणार. आम्हाला काहीही फरक पडत नाही.” असं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp