Maratha Reservation प्रश्नी पंतप्रधान नरेंद्र मोदींचं मतही समजलं पाहिजे-शाहू महाराज

मुंबई तक

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर मोदी सरकारने पुढाकार घेतला तरच हा मुद्दा सुटेल. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ठरवलं तर काहीही होऊ शकतं अशी प्रतिक्रिया छत्रपती शाहू महाराज यांनी व्यक्त केली. सुप्रीम कोर्टात मराठा आरक्षणाच्या विरोधात निकाल लागला आहे. त्याच ठिकाणाहून आपण सुरूवात केली पाहिजे. फेरविचार याचिकेत बराच वेळ जाईल, त्यातून काहीही निष्पन्न होणार नाही असं तज्ज्ञ व्यक्तींचं म्हणणं […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर मोदी सरकारने पुढाकार घेतला तरच हा मुद्दा सुटेल. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ठरवलं तर काहीही होऊ शकतं अशी प्रतिक्रिया छत्रपती शाहू महाराज यांनी व्यक्त केली. सुप्रीम कोर्टात मराठा आरक्षणाच्या विरोधात निकाल लागला आहे. त्याच ठिकाणाहून आपण सुरूवात केली पाहिजे. फेरविचार याचिकेत बराच वेळ जाईल, त्यातून काहीही निष्पन्न होणार नाही असं तज्ज्ञ व्यक्तींचं म्हणणं आहे. एवढंच नाही मराठा आरक्षण मुद्द्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं मत काय आहे हेदेखील आपल्याला समजलं पाहिजे असंही शाहू महाराजांनी म्हटलं आहे.

कोल्हापूरमध्ये आरक्षणाच्या मुद्द्यावर मूक आंदोलन सुरू करण्यात आलं. छत्रपती संभाजीराजे छत्रपती यांच्या नेतृत्वात हे आंदोलन सुरू कऱण्यात आलं. या आंदोलनात विविध लोकप्रतिनिधी सहभागी झाले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ठरवलं तर काहीही होऊ शकतं असंही यावेळी शाहू महाराज यांनी म्हटलं आहे. जनतेमध्ये समाजामध्ये नाराजी वाढली होती. संभाजीराजे यांनी रायगडावरून घोषणा केल्यानंतर आपण सौम्य पद्धतीने काम करण्याच्या सूचना केल्या. महाराष्ट्राने या प्रश्नाला एकमुखाने सामोरं गेलं पाहिजे. आपला आवाज हा मुंबईपर्यंत पोहचला आहे. आता आपला आवाज दिल्लीपर्यंत पोहचला पाहिजे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भेटीमध्ये सरकार सकारात्मक असल्याचं सांगितलं आहे. जे योग्य आहे ते मराठा समाजाला मिळेल असंही शाहू महाराज यांनी म्हटलं आहे.

Maratha Reservation : मूक आंदोलनात सहभागी होणाऱ्या लोक प्रतिनिधींना उलटसुलट बोलू नका-संभाजीराजे

मराठा आरक्षण आंदोलनातील प्रमुख मागण्या

हे वाचलं का?

    follow whatsapp