समीर वानखेडे-किरण गोसावी यांच्यात काय बोलणं झालं? प्रभाकर साईलने NCB ला काय सांगितलं?
आर्यन खान प्रकरणाला ट्विस्ट मिळाला तो साक्षीदार प्रभाकर साईल समोर आल्याने. प्रभाकर साईलने 24 ऑक्टोबरला मीडियासमोर येत, आर्य़न खानला सोडवण्याच्या बदल्यात 25 कोटी रूपये के. पी. गोसावींनी मागितले होते आणि त्यातले आठ कोटी समीर वानखेडेंना द्यायचं ठरलं होतं असं सांगितलं. त्यामुळे एकच खळबळ उडाली होती. आता प्रभाकर साईलची एनसीबीच्या विशेष चौकशी समितीकडून चौकशी सुरू आहे. […]
ADVERTISEMENT

आर्यन खान प्रकरणाला ट्विस्ट मिळाला तो साक्षीदार प्रभाकर साईल समोर आल्याने. प्रभाकर साईलने 24 ऑक्टोबरला मीडियासमोर येत, आर्य़न खानला सोडवण्याच्या बदल्यात 25 कोटी रूपये के. पी. गोसावींनी मागितले होते आणि त्यातले आठ कोटी समीर वानखेडेंना द्यायचं ठरलं होतं असं सांगितलं. त्यामुळे एकच खळबळ उडाली होती. आता प्रभाकर साईलची एनसीबीच्या विशेष चौकशी समितीकडून चौकशी सुरू आहे. यामध्ये त्याने काय सांगितलं आहे ते जाणून घेऊया.
एनसीबीच्या नव्या पथकाला तुम्ही काय माहिती दिली आहे?
मी त्यांना नवी माहिती दिलेली नाही. मुंबई पोलिसांसमोर जे पुरावे ठेवले होते आणि स्टेटमेंट दिलं होतं तेच मी आज एनसीबीला सांगितलं आहे. आज माझी चौकशी झाली त्यावेळी मी मला माहित असलेली सगळी माहिती त्यांना दिली आहे.