पत्रा चाळ जमीन घोटाळ्यात संजय राऊतांचं नाव कसं आलं?

दिव्येश सिंह

पत्रा चाळ प्रकरणात शिवसेना खासदार संजय राऊत यांना अटक झाली. गेल्या काही वर्षांपासून हे प्रकरण चर्चेत असून, आता संजय राऊतांच्या अटकेमुळे पत्रा चाळ जमीन घोटाळा पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे. नेमकं काय आहे पत्रा चाळ प्रकरण आणि संजय राऊतांचं नावं कसं आलं? पत्रा चाळ जमीन प्रकरण काय? गोरेगावमधील पत्रा चाळ पुनर्विकासासाठी गुरू आशिष कन्स्ट्रक्शननं […]

ADVERTISEMENT

mumbaitak
mumbaitak
social share
google news

पत्रा चाळ प्रकरणात शिवसेना खासदार संजय राऊत यांना अटक झाली. गेल्या काही वर्षांपासून हे प्रकरण चर्चेत असून, आता संजय राऊतांच्या अटकेमुळे पत्रा चाळ जमीन घोटाळा पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे. नेमकं काय आहे पत्रा चाळ प्रकरण आणि संजय राऊतांचं नावं कसं आलं?

पत्रा चाळ जमीन प्रकरण काय?

गोरेगावमधील पत्रा चाळ पुनर्विकासासाठी गुरू आशिष कन्स्ट्रक्शननं म्हाडासोबत करार केला होता. करारानुसार गुरू आशिष कन्स्ट्रक्शनला याठिकाणी 3,000 पेक्षा अधिक फ्लॅट बांधायचे होते. या एकूण फ्लॅटपैकी 672 फ्लॅट हे पत्रा चाळीतील रहिवाशांना दिले जाणार होते. उर्वरित फ्लॅट म्हाडा आणि गुरु आशिष फ्लॅटकडे राहणार होते.

पत्रा चाळ जमीन प्रकरणात भ्रष्टाचाराचे आरोप काय?

गुरू आशिष कन्स्ट्रक्शन कंपनीनं कोणतंही बांधकाम न करता म्हाडा आणि पत्रा चाळीतील रहिवाशांची फसवणूक केल्याचं नंतर समोर आलं. गुरू आशिष कन्स्ट्रक्शननं ही जमीन 1,034 कोटी रुपयांना दुसऱ्या बिल्डरला विकली होती.

या प्रकरणात ईडीनं प्रवीण राऊत यांना अटक केलेली. प्रवीण राऊत हे पीएमसी बँक घोटाळा प्रकरणातील प्रमुख आरोपी असलेल्या एचडीआयएलचे सारंग आणि राकेश वाधवान यांच्यासह फर्मचे एक संचालक होते.

हे वाचलं का?

    follow whatsapp