Advertisement

काय आहे फक्त नागपुरात साजरा होणाऱ्या अनोख्या मारबत, बडग्या उत्सवाचा इतिहास?

बैल पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी नागपुरात मारबत-बडग्याचा अनोखा सण साजरा केला जातो.
Marbat badgya festival in nagpur
Marbat badgya festival in nagpur

दोन वर्षांच्या कोरोना निर्बंधानंतर देशभरात सर्व सण मोठ्या उत्साहात साजरे केले जात आहेत. नागपूरमध्ये मारबत आणि बडग्याचा उत्सव गेल्या अनेक वर्षांपासून साजरा केला जातो. दोन वर्षांच्या गॅपनंतर यंदा देखील मोठ्या उत्साहात हा सण नागपुरात साजरा होतोय. यात बडग्यांवर. "लवासा ओके, बारामती ओके." "भोंगे झाले बंद. फोकनाँडे मारणारे जेलमध्ये बंद." असे राजकीय वाक्य लिहलेलं पहायला मिळालं. नागपुरातील शाहिद चौकात काळी आणि पिवळी मारबत एकमेकांच्या समोरासमोर आले. यादरम्यान हजारो नागरिक हा नजारा पाहण्यासाठी उपस्थित होते.

देशभरात फक्त नागपुरात साजरा केला जातो हा सण

नुकतंच मराठवाडा, विदर्भ येथे बैल पोळा साजरा करण्यात आला. बैल पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी नागपुरात मारबत-बडग्याचा अनोखा सण साजरा केला जातो. विदर्भात काही वेगवेगळ्या सणांची प्रथा आहे. त्यातही काही सण असे आहे की, ते सण साजरे करण्याची प्रथा केवळ नागपूरातचं आहे. यामध्ये मारबत व बडग्या हा जगातला एकमेव असा मिरवणुक प्रकार फक्त नागपूरातच आहे. ज्याला हजारो नागरिक उपस्थित असतात.

काळ्या मारबतीला 141 तर पिवळ्या मारबतीला होतायेत 137 वर्षे

मारबत उत्सव म्हणजे नागपूरला लाभलेला ऐतिहासिक वारसा. पिवळी मारबत उत्सव गेल्या १३७ वर्षांपासूनच अविरत साजरा करण्यात येतो. तर काळ्या मारबतीला सुद्धा १४१ वर्षांची ऐतिहासिक महत्व आहे. नागपुरात पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी मारबत आणि बडग्याचा उत्सव असतो. या निमित्ताने समाजातील वाईट चालीरीती आणि रोगराई दूर करण्याचे साकडे मारबतीला घालण्यात येते. या उत्‍सवात राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय मुद्यांसह स्थानिक समस्यांवरही भाष्य करणारे फलक आणि सूचक ओळींनी जनतेच्या मनातला प्रशासनाच्‍या विरोधात राग आणि संताप व्यक्त होतो.

यामुळे साजरा केला जातो मारबत, बडग्याचा उत्सव

दरवर्षी वर्षभरातील चर्चेचा विषय घेऊन बडग्या येत असतो. नागपूर शहरातील लाखो नागरिक ही मारबत मिरवणूक बघण्यासाठी रस्त्यावर उभे असतात.मारबत व बडग्या मिरवणुकी मागचा इतिहास भोसले घराण्यातील बांकाबाई हिने इंग्रजांशी हातमिळवणी केली त्याचा निषेध म्हणुन बांकाबाईचा कागद व बांबू वापरून केलेल्या पुतळयाची, तान्ह्या पोळ्याच्या दिवशी मिरवणुक काढण्यात येते. नंतर त्याचे दहन केले जाते. यामध्ये काळी व पिवळी मारबत असे दोन प्रकार आहेत. बाकांबाईच्या नवऱ्यानेपण या तिच्या कृत्याचा विरोध केला नव्हता म्हणुन त्याचाही पुतळा बनवून सोबतच त्याचीपण मिरवणुक काढतात. तिच्या नवऱ्याच्या पुतळ्याला बडग्या म्हणतात.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in