कोण आहे गौतम अदाणी यांची पत्नी? लग्नापूर्वी करायची ‘हा’ जॉब
Gautam Adani Wife Priti Adani: मुंबई: काही दिवसांपूर्वीपर्यंत जगातील तिसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती असलेले गौतम अदाणी (Gautam Adani) हे प्रचंड चर्चेत आले होते. हिंडेनबर्ग रिपोर्टमुळे त्यांच्या व्यावसायिक साम्राज्याला मोठा हादरा बसला. पण असं असलं तरीही गौतम अदाणी यांच्या वैयक्तिक आयुष्यबाबत फारशा गोष्टी समोर आलेल्या नाहीत. पण आम्ही आपल्याला गौतम अदाणींच्या पत्नीविषयी सांगणार आहोत. अदाणी आपल्या […]
ADVERTISEMENT

Gautam Adani Wife Priti Adani: मुंबई: काही दिवसांपूर्वीपर्यंत जगातील तिसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती असलेले गौतम अदाणी (Gautam Adani) हे प्रचंड चर्चेत आले होते. हिंडेनबर्ग रिपोर्टमुळे त्यांच्या व्यावसायिक साम्राज्याला मोठा हादरा बसला. पण असं असलं तरीही गौतम अदाणी यांच्या वैयक्तिक आयुष्यबाबत फारशा गोष्टी समोर आलेल्या नाहीत. पण आम्ही आपल्याला गौतम अदाणींच्या पत्नीविषयी सांगणार आहोत. अदाणी आपल्या पत्नीला आपल्या जीवनाचा आधारस्तंभ म्हणतात. अदाणी यांनी एका मुलाखतीत सांगितले होते की, प्रीती अदाणी (Priti Adani) यांनी आपल्या प्रगतीसाठी आपले करिअर पणाला लावले. (who is gautam adanis wife priti adani is doctor before marriage)
पत्नीसोबतच्या पहिल्या भेटीत अदाणी काय म्हणालेले?
गौतम अदाणी आणि प्रीती यांचं अरेंज मॅरेज झालं आहे. पहिल्या भेटीबाबत अदाणी यांनी सांगितले होते की ते खूप लाजाळू होते. अदाणी म्हणाले होते, मी एक अशिक्षित माणूस आहे आणि ती डॉक्टर.. त्यामुळे नैसर्गिकरित्या काही गोष्टी जुळत नव्हत्या.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, दोघांचे लग्न त्यांच्या कुटुंबातील वडीलधाऱ्या लोकांनी ठरवलं होतं. प्रीती यांच्याबद्दल बोलायचे तर त्यांचा जन्म मुंबईतील आहे. त्यानंतर त्या अहमदाबादला आल्या. काही काळ त्या आपल्या कुटुंबासह अमेरिकेतही राहिल्या.
प्रीती अभ्यासात खूप हुशार होत्या. त्यांनी अहमदाबादच्या शासकीय दंत महाविद्यालय आणि रुग्णालयात वैद्यकीय शिक्षण घेतले. मात्र लग्नानंतर त्यांना करिअर सोडावे लागले. 1996 मध्ये लग्नानंतर त्या गौतम अदाणी यांच्या NGO अदाणी फाऊंडेशनच्या अध्यक्षा झाल्या.