इम्रान खान यांना सत्तेतून खाली खेचणारे शाहबाज शरीफ कोण आहेत?
पाकिस्तानात इम्रान खान सरकारविरोधात शाहबाज शरीफ यांनी अविश्वास प्रस्ताव जिंकला आहे. त्यामुळे इम्रान खान सरकार कोसळलं आहे. विरोधी पक्षनेते शाहबाज शरीफ हे आता पुढचे पंतप्रधान होतील. अविश्वास प्रस्तावात पराभव पत्कारावा लागल्याने पद सोडावं लागलेले इम्रान खान हे पाकिस्तानचे पहिले पंतप्रधान ठरले आहेत. आता शाहबाज शरीफ हे पंतप्रधानपदी विराजमान होतील. शाहबाज शरीफ हे पाकिस्तान मुस्लिम लीग-नवाज […]
ADVERTISEMENT

पाकिस्तानात इम्रान खान सरकारविरोधात शाहबाज शरीफ यांनी अविश्वास प्रस्ताव जिंकला आहे. त्यामुळे इम्रान खान सरकार कोसळलं आहे. विरोधी पक्षनेते शाहबाज शरीफ हे आता पुढचे पंतप्रधान होतील. अविश्वास प्रस्तावात पराभव पत्कारावा लागल्याने पद सोडावं लागलेले इम्रान खान हे पाकिस्तानचे पहिले पंतप्रधान ठरले आहेत. आता शाहबाज शरीफ हे पंतप्रधानपदी विराजमान होतील. शाहबाज शरीफ हे पाकिस्तान मुस्लिम लीग-नवाज चे खासदार आहेत. ते माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांचे लहान भाऊ आहेत.
Pakistan : पाकिस्तानात इम्रान सत्तेचा अंत, सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव मंजूर
शाहबाज शरीफ १३ ऑगस्ट २०१८ पासून नॅशनल असेंब्लीचे सदस्य आहेत आणि विरोधी पक्षनेतेही आहेत. याआधी शाहबाज तीनवेळा पंजाब प्रांताचे मुख्यमंत्रीही होते. आत्तापर्यंत पंजाब प्रांताचे दीर्घकाळ राहिलेले मुख्यमंत्री अशीही त्यांची ओळख आहे. सध्या ते शरीफ PML-N चे अध्यक्ष आहेत.
शाहबाज शरीफ यांचा जन्म २३ सप्टेंबर १९५१ ला लाहोरमध्ये झाला. त्यांचे वडील मोहम्मद शरीफ हे एक व्यावसायिक होते. ते अनेकदा व्यवसायासाठी काश्मीच्या अनंतनागमध्ये जा-ये करत असत. त्यानंतर त्यांचं कुटुंब अमृतसरमध्ये स्थायिक झालं. १९४७ ला जी फाळणी झाली तेव्हा पाकिस्तानचा उदय झाला. त्यानंतर मोहम्मद शरीफ हे लाहोरमध्ये येऊन तिथेच स्थायिक झाले. शाहबाज शरीफ यांची आई पुलवामाची होती. लाहोरच्या एका सरकारी विद्यापीठातून पदवी घेतल्यानंतर शाहबाज यांनी आपला कौटुंबिक व्यवसाय सांभाळला.
पंतप्रधान इम्रान खान यांना मानसिक आजार, त्यांना लवकर अटक करा -मरियम शरीफ
शाहबाज यांचे दोन मोठे भाऊही आहेत. अब्बास शरीफ आणि नवाज शरीफ अशी त्यांची नावं आहेत. नवाज शरीफ हे तीनवेळा पाकिस्तानचे पंतप्रधान होते. १९७३ ला शाहबाज शरीफ यांनी त्यांच्या चुलत बहिणीशी निकाह केला. या दोघांना चार मुलं आहेत. २००३ मध्ये शाहबाज यांनी दुसरा निकाह केला. शाहबाज शरीफ हे नवाज शरीफ यांच्यापेक्षा जास्त श्रीमंत आहेत अशीही चर्चा पाकिस्तानात होते.
८० च्या दशकात शाहबाज शरीफ यांचा प्रवेश राजकारणात झाला. १९८८ मध्ये त्यांनी पहिली निवडणूक जिंकली. त्यांनी पंजाब प्रांताच्या लाहोर विधानसभेतून निवडणूक जिंकली. १९९० विधानसभा भंग झाली. १९९० मध्ये त्यांनी पुन्हा एकदा पंजाब प्रांतातून निवडणूक जिंकली. १९९३ ला पुन्हा विधानसभा भंग झाली. त्यावेळी त्यांचं सदस्यत्व गेलं. १९९३ त्यांनी पुन्हा एकदा लाहोर विधानसभा निवडणूक जिंकली. त्यानंतर त्यांनी ती जागा सोडली. २०१८ मध्येही शाहबाज शरीफ हे पंतप्रधानपदाचे दावेदार होते. मात्र त्यावेळी इम्रान खान यांचा पक्ष जिंकला आणि ते पंतप्रधान झाले.