Pradeep Gharat : राणा, राणेंना जेलमध्ये टाकणारे प्रदीप घरत कोण आहेत?
राणा असो की राणे… ठाकरे सरकारने धाव घेतली ती एकाच वकिलाकडे. ते वकील म्हणजे, प्रदीप घरत. घरत यांच्याच युक्तीवादाने राणेंना आणि दोन्ही राणांना कोठडी जावं लागलं. वेगवेगळ्या केसेसमध्ये प्रदीप घरत हेच सरकारी वकील म्हणून पोलिसांची बाजू मांडत आहेत. त्यामुळेच आपण प्रदीप घरत कोण आहेत, ते ठाकरेंनाच नाही, तर फडणवीसांनाही का आवडतात आणि आरोपीला जन्मठेप मिळवून […]
ADVERTISEMENT

राणा असो की राणे… ठाकरे सरकारने धाव घेतली ती एकाच वकिलाकडे. ते वकील म्हणजे, प्रदीप घरत. घरत यांच्याच युक्तीवादाने राणेंना आणि दोन्ही राणांना कोठडी जावं लागलं. वेगवेगळ्या केसेसमध्ये प्रदीप घरत हेच सरकारी वकील म्हणून पोलिसांची बाजू मांडत आहेत. त्यामुळेच आपण प्रदीप घरत कोण आहेत, ते ठाकरेंनाच नाही, तर फडणवीसांनाही का आवडतात आणि आरोपीला जन्मठेप मिळवून देण्यातले मास्टर म्हणून त्यांची ख्याती का आहे? हेच जाणून घेणार आहोत.
आतापर्यंत आपण राज्यात कोणतंही मोठं प्रकरण घडलं की उज्जवल निकम हे सरकारी वकील म्हणून पोलिसांची म्हणजेच सरकारची बाजू मांडायचे. पण आता काळ बदलला आहे. सरकार कुणाचंही असो सरकारी वकील प्रदीप घरत असतात.
महाविकास आघाडी सरकारची प्रतिष्ठा पणाला लागलेल्या प्रकरणात घरत यांनीच सरकारी वकील म्हणून बाजू मांडली. गेल्या काही काळात तर घरत हे ठाकरे सरकारचे फेवरेट वकील म्हणून समोर आलेत. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल घरत सरकारला एवढं का आवडतात? तर त्याचं उत्तर आपल्याला घरत यांनी आतापर्यंत लढवलेल्या वेगवेगळ्या केसेसमध्ये सापडतं. त्यामुळेच आपण प्रदीप घरत कोण आहेत, आणि त्यांनी कोणकोणत्या केसेस लढवल्या ते बघावं लागतं.
इंडिया टुडे, आज तकसाठी कोर्ट बीट बघणाऱ्या पत्रकार विद्या यांनी घरत कोण आहेत, त्यांनी कोणकोणत्या केसेस लढवल्या याची माहिती दिली. विद्या यांनी दिलेल्या माहितीनुसार, घरत हे मुळचे अलिबागचे असलेले सध्या मुंबईत राहतात. एक शांत, मृदुभाषी वकील म्हणून ते ओळखले जातात.