शिवजयंती उत्सवाला का असते नेहमी वाद आणि राजकारणाची किनार?
छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे महाराष्ट्राची अस्मिता, महाराष्ट्राचे आराध्य दैवत… त्यामुळे छत्रपती शिवरायांची जयंती हा शिवभक्तांसाठी अत्यंत जिव्हाळ्याचा असा विषय आहे. मात्र, असं असलं तरीही गेल्या काही वर्षांपासून शिवजयंतीवरुन राजकीय पक्षांच्या वेगवेगळ्या भूमिका समोर आल्या आहेत आणि त्यामुळे काही वाद देखील समोर आले होते. दुसरीकडे यंदा पुन्हा एकदा शिवाजी महाराजांच्या जयंतीवरुन एक नवं राजकारण पाहायला मिळत […]
ADVERTISEMENT

छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे महाराष्ट्राची अस्मिता, महाराष्ट्राचे आराध्य दैवत… त्यामुळे छत्रपती शिवरायांची जयंती हा शिवभक्तांसाठी अत्यंत जिव्हाळ्याचा असा विषय आहे. मात्र, असं असलं तरीही गेल्या काही वर्षांपासून शिवजयंतीवरुन राजकीय पक्षांच्या वेगवेगळ्या भूमिका समोर आल्या आहेत आणि त्यामुळे काही वाद देखील समोर आले होते. दुसरीकडे यंदा पुन्हा एकदा शिवाजी महाराजांच्या जयंतीवरुन एक नवं राजकारण पाहायला मिळत आहे. महाराष्ट्रात कोरोनाचं संकट अद्यापही कायम असल्याने यंदा शिवजयंती साधेपणाने साजरा करण्यात यावी. असं पत्रक राज्य शासनाने कालं (11 फेब्रुवारी) जारी केलं होतं. त्यामध्ये शिवजयंती सोहळ्यासाठी फक्त 10 जणांना परवानगी देण्यात आली होती. यावरुन भाजप आणि संभाजी ब्रिगेडने ठाकरे सरकारवर जोरदार टीका केली. त्यामुळे आता शिवजयंती सोहळ्यावरुन पुन्हा एकदा राजकारणाला सुरुवात झाली आहे.
शिवजयंती सोहळ्याच्या निर्णयावरुन भाजपची सरकारवर टीका
दरवर्षी १९ फेब्रुवारीला शासकीय शिवजयंती (तारखेनुसार) मोठ्या जल्लोषात साजरी केली जाते. मात्र, यंदा कोरोनावरील उपाययोजनांना राज्य सरकारने २८ फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ दिलेली आहे. त्यामुळेच या सगळ्याचा विचार करुन सरकारने शिवजयंतीच्या सोहळ्यावर काही निर्बंध घातले. ज्यानंतर भाजप नेते राम कदम यांनी सरकारवर बरीच टीका केली. महाराष्ट्र सरकारने तुघलकी निर्णय मागे घ्यावं, त्यांना एल्गार परिषद, किसान मोर्चा, रेल्वे आणि बसमधील गर्दी चालते. पण त्यांना आमचे हिंदू सण खटकतात. असं म्हणत त्यांनी राज्य सरकारवर टीका केली होती. यासह भाजपच्या इतरही नेत्यांनी सरकारवर जोरदार निशाणा साधला.
#छत्रपतीशिवाजीमहाराज यांच्या जयंतीला परवानगी नाही ? शिवरायांच्या महाराष्ट्रात हे घडतंय ही शरमेची गोष्ट आहे. @OfficeofUT आपण खुद्द हिंदुत्वाचे पुरस्कर्ते होतात. आपला पक्षही शिवरायांच्या नावाने चालतो. अशावेळी शिवरायांची जयंती महाराष्ट्रात उत्साहात साजरी करण्यावर निर्बंध का ? pic.twitter.com/yArDUoLrBJ
— Ram Kadam – राम कदम (@ramkadam) February 12, 2021
राज्य सरकार शिवद्रोही असल्याची संभाजी ब्रिगेडची टीका