Ramdevbaba : "महिलांनी साडी, ड्रेस काहीही घातलं नाही तरीही त्या छान दिसतात"

वाचा सविस्तर बातमी पतंजलीच्या कार्यक्रमात काय बोलून गेले रामदेवबाबा
yogguru baba ramdev statement on ladies says even if women dont wear any clothes they look good
yogguru baba ramdev statement on ladies says even if women dont wear any clothes they look good

योगगुरू रामदेवबाबा यांनी महिलांविषयी वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. ठाण्यात पतंजलीचं महिलांचं संमेलन आयोजित करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात अमृता फडणवीसही उपस्थित होत्या. अमृता फडणवीस यांचं कौतुक करताना रामदेवबाबांनी वादग्रस्त वक्तव्य केलं. सोशल मीडियावर त्यांचा हा व्हीडिओ व्हायरल झाला आहे.

काय म्हटलं आहे रामदेवबाबांनी?

महिलांसाठी योगासनांचे ड्रेस आणण्यात आले आहे. पतंजली महिला संमेलनात अमृता फडणवीसही आल्या होत्या. यावेळी अमृता फडणवीस यांचं त्यांनी कौतुक केलं. अमृता फडणवीस या कायम प्रसन्न असतात. लहान मुलांप्रमाणे त्यांच्या चेहऱ्यावर हसू असतं. असं हसू मला प्रत्येक महिलेच्या चेहऱ्यावर पाहायचं आहे. यापुढे ते म्हणाले महिला साड्या नेसून चांगल्या दिसतात. त्या सलवार सूटमध्येही चांगल्या दिसतात आणि माझ्या नजरेने पाहिलं तर काही नाही घातलं तरीही चांगल्या दिसतात असं रामदेवबाबांनी म्हटलं आहे.

अमृता फडणवीस १०० वर्षे म्हाताऱ्या होणार नाहीत

या कार्यक्रमात रामदेवबाबांनी अमृता फडणवीस यांचं खूप कौतुक केलं. अमृता फडणवीस यांना तरूण राहण्याची इतकी हौस आहे की मला वाटतं की त्या १०० वर्षे म्हाताऱ्या होणार नाहीत. त्या खूप प्रमाणात अन्न ग्रहण करतात आणि कायम खुश राहतात. त्यांच्या चेहऱ्यावर कायमच लहान मुलाचं हसू असतं. असं म्हणत रामदेवबाबांनी अमृता फडणवीस यांचं कौतुक केलं आहे.

काय घडलं कार्यक्रमात?

महिलांनी योगासाठी ड्रेस आणले होते आणि त्यानंतर महिलांसाठी महासंमेलानाचे आयोजन करण्यात आले होते. या महासंमेलानासाठी महिलांनी साड्या आणल्या होत्या. मात्र सकाळी योग विज्ञान शिबिर झाले, त्यानंतर महिलांना योग प्रशिक्षण उपक्रम पार पडला त्यांनात्रा लगेच महिलांसाठी महासंमेलन सुरू करण्यात आले. त्यामुळे महिलांना साड्या नेसायला वेळच मिळाला नाही. याच कार्यक्रमात अमृता फडणवीस आल्या होत्या. अमृता फडणवीस या स्टेजवर बसलेल्या असतानाच रामदेवबाबांनी वादग्रस्त वक्तव्य केलं.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in