सत्तासंघर्ष: ठाकरे-शिंदेंची व्हीपवरुन जुंपली.. जाणून घ्या खरा व्हीप कोणाचा असणार?

मुंबई तक

ADVERTISEMENT

after supreme court verdict thackeray shinde group clash over whip knowing who will be the real whip
after supreme court verdict thackeray shinde group clash over whip knowing who will be the real whip
social share
google news

Supreme Court Judgement: मुंबई: महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाबाबत (Maharashtra Political Crisis) सुप्रीम कोर्टाने (Supreme Court) महत्त्वाचा निकाल दिला. ज्यामध्ये कोर्टाने शिंदे सरकार (Shinde Govt) हे कायम ठेवलं. पण याचसोबत आमदार अपात्रतेचा निर्णय हा विधानसभा अध्यक्ष (Speaker of Assembly) घेतील असं म्हणत व्हीप (Whip) आणि राजकीय पक्ष नेमकं कोण हे देखील त्यांनाच ठरवावं लागेल असं म्हटलं आहे. कोर्टाने भरत गोगावले (Bharat Gogawale) यांची व्हीप म्हणून झालेली नियुक्ती बेकायदेशीर ठरवली आहे. त्यामुळे आता ठाकरे आणि शिंदे गटाकडून असा दावा केला जातोय की, खरा व्हीप हा आमचाच आहे. त्यामुळे खरा व्हीप कोण याबाबत आता नवा गुंता तयार झाला आहे. ज्याविषयी आपण सविस्तरपणे जाणून घेऊया. (after supreme court verdict thackeray shinde group clash over whip knowing who will be the real whip)

माझ्या शिवसेनेचाच व्हीप लागू होणार: उद्धव ठाकरे

कोर्टाच्या निकालानंतर उद्धव ठाकरेंनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते म्हणाले की, ‘फुटीरांचा व्हीप हा सर्वोच्च न्यायालयाने नामंजूर केला आहे. त्यामुळे माझ्या शिवसेनेचाच व्हीप लागू होणार.’

राजकीय पक्ष एकनाथ शिंदे आहेत..: फडणवीस

दरम्यान, उद्धव ठाकरेंनी केलेला हा दावा एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन खोडून काढला आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

व्हीपच्या मुद्द्यावर बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ‘जिथवर व्हिपचा प्रश्न आहे.. त्याबाबत कोर्टाने म्हटलं आहे की, राजकीय पक्ष व्हीप नियुक्त करतं. त्यांनी म्हटलं आहे की, राजकीय पक्षाची ती नाळ तोडता येणार नाही. पण आम्हाला जे समजलं आहे ते खूपच स्पष्ट आहे की, राजकीय पक्ष कोण आहे. तर राजकीय पक्ष एकनाथ शिंदे आहेत. कारण की, निवडणूक आयोगासमोर आम्ही जी मागणी केली होती त्या मागणीच्या आधारे निवडणूक आयोगाने शिंदेंची याचिका मान्य करत राजकीय पक्ष म्हणून त्यांना मान्यता दिली आहे.’

‘आता याचा निर्णय हा विधानसभा अध्यक्षांना घ्यायचा आहे. याबाबत त्याविषयी चर्चा करणं हे चुकीचं ठरेल. आता विधानसभा अध्यक्ष ठरवतील की, त्यावेळी राजकीय पक्ष शिंदे होते की, इतर कोणी होतं.’

ADVERTISEMENT

हे ही वाचा >> Maharashtra political crisis Live : शिंदे सरकार वाचलं! कोर्टाने काय म्हटलं?

‘आता निर्णय अध्यक्षांना घ्यायचा आहे. त्यामुळे त्याबाबत काही अंदाजे बोलणं हे योग्य होणार नाही. त्यावर प्रश्न विचारणं योग्य होणार नाही.’ असं देवेंद्र फडणवीस हे यावेळी म्हणाले.

ADVERTISEMENT

शिवसेना आम्ही आहोत, धनुष्यबाण आम्ही आहोत: शिंदे

‘जेव्हा आम्ही सरकार बनविण्याचा निर्णय घेतला त्याच्या तीन महिन्यानंतर निवडणूक आयोगाने आम्हाला आम्ही शिवसेना पक्ष आहोत हा निर्णय दिला होता.’

‘निवडणूक आयोगाने शिवसेना नाव, धनुष्यबाण चिन्ह हे आम्हाला दिलं आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे संभ्रम पसरविण्याचा प्रयत्न करत आहेत. आता ते कोणाला व्हीप बजावू शकतात. शिवसेना म्हणून देऊ शकतात का? शिवसेना आम्ही आहोत. धनुष्यबाण आम्ही आहोत.’

‘लोकांची सहानुभूती केव्हा मिळाली असती… जर तुम्ही भाजपसोबत सरकार स्थापन केलं असतं तर. तुम्ही कोणाबरोबर सरकार बनवलं? आम्ही तर ते दुरूस्त केलं.’

‘व्हीपबाबत आता निर्णय अध्यक्षांकडे आहे. त्यामुळे आम्ही तेव्हा कोण पार्टी होती.. कोण विधिमंडळ पक्ष आणि कोण राजकीय पक्ष याचा अधिकार कोणाला आहे तर तो अध्यक्षांना आहे. आज शिवसेना म्हणून व्हीप देऊ शकतो असं म्हणत संभ्रम पसरवला जात आहे. आता लोकं सुज्ञ आहे.’ असं म्हणत मुख्यमंत्री शिंदे यांनी आपणच शिवसेना आहोत आणि व्हीपही आपलाच लागू होईल असं ते म्हणाले.

त्यावेळचा व्हीप हा मान्य करावाच लागेल: अनिल परब

शिंदे-फडणवीसांच्या पत्रकार परिषदेनंतर शिवसेना (ठाकरे) गटाचे नेते अनिल परब यांनी मुंबई Tak ला दिलेल्या विशेष मुलाखतीत म्हटलं की,
‘जो मूळ पक्ष होता शिवसेनेचा त्यांचा व्हीप मान्य झाला आहे. अपात्रतेचा निर्णय कधी होतो.. तर तुम्ही व्हीपचं उल्लंघन केलं की होतं. त्यामुळे या सगळ्यांसमोर अपात्र होण्याशिवाय पर्याय नाही.’

‘आता शिंदे-फडणवीस जे सांगत आहेत ते बेकायदेशीर ठरवलं आहे ते मुद्दे सांगतच नाहीत. कोर्टाने स्पष्ट म्हटलं की, विधिमंडळ पक्ष व्हीप ठरवू शकत नाही. ते तर राजकीय पक्ष ठरवतो. हे तर कोर्टाने ठासून सांगितलं आहे. त्यामुळे आता विधिमंडळ पक्षाचा निर्णय योग्य ठरत नाही. राजकीय पक्षाने घेतलेला निर्णयच योग्य ठरतो.’

हे ही वाचा >> सुप्रीम कोर्ट निकाल: ठाकरेंना ‘ती’ एक चूक भोवली, महाराष्ट्रात शिंदेंचंच सरकार!

‘तुम्ही गटाच्या हिशोबाने पार्टीचं चिन्ह देऊ शकत नाही. यामुळे निवडणूक आयोगाच्या निर्णयाला जे आव्हान दिलं आहे. त्याचा देखील आजच्या निकालात उल्लेख आहे.’

‘त्यावेळचा व्हीप हा मान्य करावाच लागेल. मी संसदीय कार्यमंत्री होतो.. त्यामुळे मला एक नक्की माहिती आहे की, व्हीप तर सुनील प्रभू नक्की झालाय.. कारण भरत गोगावलेंना व्हीप म्हणून बेकायदेशीर ठरवलं आहे. त्यामुळे गोगावले आता व्हीप राहू शकत नाही. आता राजकीय पक्ष ते ठरवतील.. पण आमदारांना अपात्रतेपासून वाचवता येणार नाही.’

नेमका व्हीप कोण हे कसं ठरणार?

दरम्यान, आता दोन्ही गट आपआपल्या बाजूने दावा करत आहेत. मात्र, आता याबाबत सर्वस्वी अधिकार हे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या हातात आहेत. कारण व्हीपचा आणि आमदार अपात्रतेचा निर्णय हा विधानसभा अध्यक्षांनीच घ्यायचा आहे. असं सुप्रीम कोर्टाने आपल्या निर्णयात म्हटलं आहे. अशावेळी आता सर्व अधिकार विधानसभा अध्यक्षांकडे असणार आहेत.

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर म्हणतात, मी…

याबाबत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर म्हणाले की, कोर्टाने स्पष्टपणे म्हटलं आहे की, व्हीप ठरविण्याचा अधिकार हा विधानसभा अध्यक्षांचा आहे. त्यामुळे राजकीय पक्ष कोण.. कोणत्या राजकीय पक्षाचा व्हीप कोण याबाबत सगळे निकष तपासून निर्णय घेतला जाईल. त्यानुसारच आमदार अपत्रातेचा निर्णय देखील घेतला जाईल. असंही राहुल नार्वेकर यावेळी म्हणाले आहेत. त्यामुळे आता या सगळ्या सत्तासंघर्षात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची भूमिका ही महत्त्वाची ठरणार आहे.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT