Politics: भारतातील राजकीय नेत्यांच्या 'रिटायरमेंट'चा इतिहास नेमका आहे तरी काय? - Mumbai Tak - ajit pawar sharad pawar retire politics maharashtra issue of retirement of political leaders in india politics in marathi - MumbaiTAK
बातम्या राजकीय आखाडा

Politics: भारतातील राजकीय नेत्यांच्या ‘रिटायरमेंट’चा इतिहास नेमका आहे तरी काय?

Politics in Marathi: अजित पवार यांनी शरद पवारांना निवृत्तीचा सल्ला दिल्यानंतर महाराष्ट्रातील राजकारण ढवळून निघालं. पण यामुळे भारतातील राजकीय नेत्यांच्या निवृत्तीचा आणखी एक मुद्दा आता समोर आला आहे. जाणून घेऊयात याचविषयी सविस्तरपणे.
Updated At: Jul 10, 2023 19:31 PM
After Ajit Pawar advised Sharad Pawar to retire, politics in Maharashtra got stirred up. But due to this, another issue of retirement of political leaders in India has come to the fore

Political in Marathi: मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी अचानक बंड केलं. जवळपास शिंदेंच्याच पावलावर पाऊल टाकताना ते पाहायला मिळतायत, मात्र या सगळ्यात अजित पवार एक चूक करून बसले.. शरद पवारांचं (Sharad Pawar) वय काढणं ही त्यांच्यासाठी मोठी चूक असल्याचं म्हटलं जात आहे. 82 झालं, 83 झालं, तुम्ही कधी थांबणार आहात का नाही? या अजित पवारांच्या वक्तव्याने आता ते अडचणीत आलं आहे, यावरून पवारही म्हणाले वय 83 असलं तरी ‘ना टायर्ड हू, ना रिटायर्ड’, पण या सगळ्यात चर्चा होतेय की राजकीय रिटायरमेंटची. खाजगी असो वा सरकारी नोकऱ्या 58-60 वयोगटात तुम्ही आलात की तुमची निवृत्ती होते. कला-साहित्य अशा क्षेत्रात रिटायरमेंट (Retirement) नसली तरी तुमच्या भूमिका बदलतात. 30-40 असलेला हिरो जे अक्शन सीन करतो, ते काही 80 वर्षाच्या हिरोला मिळत नाहीत. मग राजकारण हे एकच असं क्षेत्र आहे का, जिथे रिटायरमेंटच नसते? वय झालं म्हणून काही नेत्यांनी जबाबदारींमधून मुक्त होणं पसंत केलंय का? आपल्या भारतीय राजकीय नेत्यांचा काय आहे रिटायरमेंटचा इतिहास? हे आपण सविस्तरपणे जाणून घेऊयात. (ajit pawar sharad pawar retire politics maharashtra issue of retirement of political leaders in india politics in marathi)

भारतात लोक साधारण वयाच्या 70 वर्षापर्यंत जगतात. भारतातील मध्यम वय पाहिल तर ते 28 वर्षे आहे. म्हणजे भारतातील अर्ध्या लोकांचं वय 28हून अधिक आहे, आणि अर्ध्या जनतेचं वय 28हून कमी. भारत जगातला सर्वात तरूणवर्ग असलेला देश, पण राजकारणी मात्र आपले फारसे तरूण पाहायला मिळत नाही. आपल्या लोकसभेतले अर्ध्याहून अधिक खासदार हे 54 वर्षावरील आहेत. 239 खासदार 60-80, 11 खासदार 80-90 वर्षे आणि एका खासदाराचं वय तर 93 वर्षे आहे (सपा- Shafiqur Rahman Barq)

हे ही वाचा >> शरद पवारांची साथ सोडलेल्या ‘या’ मातब्बर नेत्यांचं काय झालं?, ‘या’ दिग्गजांनी गमावलीय आमदारकी

व्यवसायात रिटायरमेंट जरी नसेल तरी शरीर साथ देईल, पुढची पिढी तयार होईल तोवर ती व्यक्ती काम करत राहते, पण राजकारणात तसं नाहीये. वय काहीही असो, नेता पक्षाचा अध्यक्ष बनून सुद्धा राहतो किंवा मुख्यमंत्री/पंतप्रधान बनून सुद्धा राहतो. नेते म्हणू शकतात जोवर मी निवडणुका जिंकतोय, लोकांचा माझ्यावर विश्वास आहे तोवर मी अमूक-अमूक पदावर कायम राहणार.

भारतीय संविधानात आमदार-खासदारांसाठी कमीत कमी वय तर सांगण्यात आलं आहे, 25 वर्षे. पण जास्तीत जास्त किती? हे नाही सांगण्यात आलं आहे. वय 100 वर्षे असेल, नेता हॉस्पिटलमध्ये असेल किंवा तुरूंगात असेल तरीही तो निवडणूक लढवू शकतो, त्याचा करिष्मा असेल तर जिंकूही शकतो. म्हणूनच भारतामध्ये जवळपास 90 टक्क्यांहून अधिक नेते आजीवन सक्रीय राजकारणात असल्याचं पाहायला मिळतं.

राजकारण.. वय आणि निवृत्ती

नेत्यांचं वय आणि त्यांचं राजकारणात सक्रीय असणं ह्यावर जर नजर टाकायची असेल तर सुरूवात करूया महाराष्ट्रापासूनच शरद पवार, वय 83, तरी राष्ट्रवादीचे अध्यक्ष आहेत आणि राज्यसभेचे खासदारही.

बाळासाहेब ठाकरेही त्यांच्या निधनापर्यंत शिवसेनेचे पक्षप्रमुख राहिलेले. 2018 मध्ये तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री आणि डीएमके नेते एम करूणानिधी यांचं 94व्या वर्षी निधन झालं. तेव्हा ते तामिळनाडू विधानसभेत आमदारही होते आणि डीएमके पक्षाचे प्रमुखही होते.

हे ही वाचा >> एकनाथ शिंदेंना नको तेच होणार; अजित पवारांकडे जाणार तिजोरीच्या चाव्या!

पंजाबचे माजी मुख्यमंत्री प्रकाशसिंह बादल 2022 मध्ये 94 वर्षी विधानसभा निवडणूक लढवली, ज्यात ते हरले. पण ते जिंकले असते तर ते देशातील सर्वाधिक वय असलेले आमदार ठरले असते.

2022 मध्ये 82 व्या वर्षी मुलायम सिंह यादव यांचं निधन झालं. पण तेव्हा ते लोकसभेचे खासदार होते. भारताचे माजी पंतप्रधान एच.डी.देवेगौडा, 90व्या वर्षीही राज्यसभा खासदार आहेत, विशेष म्हणजे त्यांची हजेरी 64 टक्के आहे, इतकंच नाही तर जनता दल सेक्युलरचे ते अध्यक्षही आहेत.

भारतातील सगळ्यात जुना पक्ष काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे 80 वर्षांचे आहेत, त्यांच्या आधीच्या अध्यक्षा सोनिया गांधी 76 वर्षांच्या आहेत. हे दोघेही खासदार आहेत.

हे ही वाचा >> Ajit Pawar: अजितदादांचा हट्ट, शिंदेंसाठी इकडे आड तिकडे… खातेवाटपाचं घोडं ‘इथे’ अडलंय!

75 वर्षांचे लालू प्रसाद यादव RJD चे अध्यक्ष आहेत. तर 85 वर्षाचे फारूख अब्दुल्ला नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष आहेत, आणि लोकसभेचे खासदारही. याशिवाय 79 वर्षांचे शिबू सोरेन झारखंड मुक्ती मोर्चाचे अध्यक्ष आहेत. तसेच 76 वर्षाचे नवीन पटनायक हे ओरिसाचे विद्यमान मुख्यमंत्री आहेत. तसेच बीजू जनता दलाचे अध्यक्षही आहेत. NTR सुद्धा वयाच्या 71 व्या वर्षापर्यंत TDP चे अध्यक्ष राहिले. चंद्राबाबू नायडूंच्या बंडामुळे अध्यक्षपद NTR यांच्याकडून नायडूंकडे गेलं. पण आताही 73 वर्षांचे असतानाही पक्षाचे अध्यक्ष आहेत. डॉ. मनमोहन सिंह 90 वर्षांचे झाले आहेत, तरी ते राज्यसभेचे खासदार आहेत.

जगात काय आहे?

कॅनडा- 75 किंवा त्याहून अधिक वर्षीय व्यक्ती हाऊस ऑफ कॉमनचा सदस्य नाही होऊ शकत.

अमेरिका- 8 वर्षापेक्षा जास्त कार्यकाळ अध्यक्षांचा असू शकत नाही. जो बायडन 80 वर्षांचे असूनही अध्यक्ष आहेत, पुन्हाही होऊ शकतात, पण नंतर जेव्हा ते 84-85 वर्षांचे होतील तेव्हा पुन्हा ते राष्ट्राध्यक्ष होऊ शकणार नाहीत.

Wine पाण्यासोबत का घेत नाहीत? Almond : गरजेपेक्षा जास्त बदाम खाताय! ‘हे’ दुष्परिणाम माहिती आहेत का? तुम्हाला तर ‘या’ सवयी नाहीत ना? असतील तर वाढेल तुमचं Belly Fat! Virat Kohli : ग्लॅमरस फुटबॉलर विराट कोहलीवर फिदा, कोण आहे ‘ती’? मलायकानंतर गर्लफ्रेंडने साथ सोडली, अरबाजच्या ब्रेकअपची चर्चा ‘या’ गोष्टी नियमित फॉलो केल्यात तर Weight Loss ची 100% गॅरंटी! अभिनेत्रीचा कमाल Fitness, घेते खास डाएट प्लान! Water Fastion पद्धतीने खरंच चुटकीसरशी होईल Weight Loss? Places to visit: भारतातच पण कमी बजेटमध्ये ‘या’ सुंदर ठिकाणांना नक्की भेट द्या! PM Modi कोणता फोन वापरतात? फोटो Viral रणदीप हुडाने मैतेई धार्मिक पद्धतीने का केलं लग्न? सांगितली फॅमिली प्लानिंग BB17: 19 वर्षीय अभिनेत्रीचे लाईव्ह ब्रेकअप, दुसरे नातेही तोडले Fitness पाहून वयाचा अंदाज लावणं कठीण; सुपरस्टार्स आहेत तरी किती वर्षांचे? Beauty Tips: चाळीशीत दिसा अगदी टीप-टॉप! फक्त ‘या’ गोष्टी करा फॉलो! महाराष्ट्राचे मिनी काश्मीर, पाचगणी-महाबळेश्वर हरवले धुक्यात …म्हणून परिणीतीने ॲनिमल सोडला Liplock नंतर रणबीर-रश्मिकाचा बेडरुम सीन व्हायरल, इंटिमेट सीनचा कहर ‘कपिल शर्मा शो’मध्ये ‘हा’ कलाकार घेतो सर्वाधिक मानधन? …तर आयुष्यभर कोलेस्ट्रॉल कमी नाही होणार सिगारेट सोडल्यानंतर शरीरामध्ये होतात ‘हे’ बदल