अंधेरी पूर्व पोटनिवडणूक : भाजपच्या मुरजी पटेलांनी उमेदवारी अर्ज भरण्याची तयारी केली, पण…

मुंबई तक

Andheri east bypoll 2022 : ‘शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे’कडून रमेश लटकेंच्या पत्नी ऋतुजा लटकेंना उमेदवारी देण्याची घोषणा करण्यात आलीये. त्यामुळे शिंदे गटाची कोंडी झाली असून, आता मुरजी पटेलांचा उमेदवारी अर्ज भरण्याचा मुहूर्त आणखी एक दिवस लांबणीवर गेलाय. त्यामुळे भाजप-शिंदे गटातल्या हालचालींकडे सगळ्यांच्या नजरा लागल्यात. अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीच्या निमित्ताने उद्धव ठाकरेंसमोर पेच उभा ठाकला असताना […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

Andheri east bypoll 2022 : ‘शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे’कडून रमेश लटकेंच्या पत्नी ऋतुजा लटकेंना उमेदवारी देण्याची घोषणा करण्यात आलीये. त्यामुळे शिंदे गटाची कोंडी झाली असून, आता मुरजी पटेलांचा उमेदवारी अर्ज भरण्याचा मुहूर्त आणखी एक दिवस लांबणीवर गेलाय. त्यामुळे भाजप-शिंदे गटातल्या हालचालींकडे सगळ्यांच्या नजरा लागल्यात.

अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीच्या निमित्ताने उद्धव ठाकरेंसमोर पेच उभा ठाकला असताना भाजप-शिंदे गटातल्या हालचालींकडे सगळ्यांची नजर लागलीये. अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीत रमेश लटकेंच्या पत्नी ऋतुजा लटकेंना उमेदवारी देण्याची तयारी उद्धव ठाकरेंनी केली.

मात्र, ऋतुजा लटकेंच्या नोकरीच्या राजीनाम्यामुळे त्यांच्या उमेदवारीबद्दल अनिश्चितता निर्माण झालीये. तर दुसरीकडे ‘भाजप-बाळासाहेबांची शिवसेना’ युतीतही पडद्यामागे घडामोडी घडताहेत. भाजपनं अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीत उमेदवाराची अधिकृत घोषणा केलेली नाही. मात्र, अंधेरी पूर्वची जागा भाजप लढवणार हे स्पष्ट आहे.

अंधेरी पूर्व मधून भाजपचे मुरजी पटेल निवडणूक लढवणार असून, ते आज उमेदवारी अर्ज दाखल करणार होते. मात्र, अचानक उमेदवारी अर्ज भरणं आज टाळण्यात आलं आहे. मुरजी पटेल उद्या अर्ज दाखल करणार असल्याचं सांगण्यात आलंय. उमेदवारी अर्ज भरण्याचा उद्या अखेरचा दिवस आहे. त्यामुळे भाजप-शिंदे अखेरच्या धक्का देऊ शकतं, अशी चर्चा आता सुरू झालीये.

हे वाचलं का?

    follow whatsapp