‘भाजपनं अंधेरीची पोटनिवडणूक लढवू नये’; राज ठाकरेंचा ऋतुजा लटकेंना पाठिंबा, फडणवीसांना पत्र

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघात होत असलेल्या पोटनिवडणुकीसंदर्भात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पक्षाची भूमिका जाहीर केली. राज ठाकरेंनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांना पाठिंबा जाहीर केलाय. महत्त्वाचं म्हणजे राज ठाकरेंनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवून ऋतुजा लटकेंविरुद्ध निवडणूक न लढवण्याचं आवाहन केलंय. त्यामुळे राज ठाकरेंच्या आवाहनाला भाजपकडून काय प्रतिसाद मिळतो हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.

अंधेरी पूर्व विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला सुरूवात होण्यापूर्वीच रंगत आलीये. अंधेरी पोटनिवडणुकीबद्दल आतापर्यंत मनसेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी कोणतंही भाष्य केलेलं नव्हतं. मात्र, आज राज ठाकरे यांनी पत्रातून त्यांची भूमिका मांडलीये. विशेष बाब म्हणजे राज ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांना लिहिलेल्या पत्रातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या उमदेवार ऋतुजा लटके यांना पाठिंबा जाहीर केलाय.

‘आमदार कै. रमेश लटके ह्यांच्या दुर्दैवी निधनानंतर अंधेरी (पूर्व) विधानसभा पोट-निवडणुकीबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ह्यांना नम्र आवाहन आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची धोरणात्मक भूमिका’, असं म्हणत राज ठाकरेंनी हे पत्र सोशल मीडिया हॅण्डलवर पोस्ट केलं आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

Andheri ByPoll: पोटनिवडणुकीच्या रिंगणात २५ उमेदवार, मुख्य लढत ऋतुजा लटके-मुरजी पटेल यांच्यात

अंधेरी पोटनिवडणूक : फडणवीसांना निवडणूक बिनविरोध करण्याचं राज ठाकरेंचं आवाहन

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे हे देवेंद्र फडणवीसांना लिहिलेल्या पत्रात म्हणतात, ‘प्रिय मित्र देवेंद्र, सस्नेह जय महाराष्ट्र! एक विशेष विनंती करण्यासाठी हे पत्र आपणांस लिहितो आहे. आमदार कै. रमेश लटके यांच्या दुर्दैवी निधनानंतर आज अंधेरी (पूर्व) या विधानसभेच्या जागेसाठी पोट-निवडणूक जाहीर झाली आहे. तिथे त्यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे.’

ADVERTISEMENT

‘कै. रमेश एक चांगले कार्यकर्ते होते. अगदी शाखा-प्रमुखापासून त्यांची वाटचाल सुरू झाली. त्यांच्या राजकीय प्रवासाचा मी एक साक्षीदार आहे. त्यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नीनं आमदार होण्यानं कै. रमेश यांच्या आत्म्यास खरोखर शांती मिळेल’, अशी भूमिका राज ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांना लिहिलेल्या पत्रात मांडलीये.

‘माझी विनंती आहे की भारतीय जनता पक्षानं ती निवडणूक लढवू नये आणि त्यांच्या पत्नी ऋतुजा लटके आमदार होतील हे पहावं’, असंही राज ठाकरेंनी पत्रात म्हटलंय.

ADVERTISEMENT

राज ठाकरेंच्या मनसेचा ऋतुजा लटकेंना पाठिंबा

‘मी आमच्या पक्षातर्फे अशा परिस्थितीत जेव्हा दिवंगत आमदाराच्या घरच्या व्यक्ती निवडणूक लढवतात, तेव्हा शक्यतो निवडणूक न लढवण्याचं धोरण स्वीकारतो. तसं करण्यानं आपण त्या दिवंगत लोकप्रतिनिधीला श्रद्धांजलीच अर्पण करतो, अशी माझी भावना आहे. आपणही तसं करावं असं मला माझं मन सांगतं’, असा सल्ला राज ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांना दिलाय.

अंधेरी पोटनिवडणूक : भाजप उमेदवार मागे घेणार? ठाकरेंच्या पत्रावर फडणवीसांनी मांडली भूमिका

राज ठाकरे पुढे म्हणतात, ‘असं करणं हे आपल्या महाराष्ट्राच्या महान संस्कृतीशी सुसंगतही आहे. मला आशा आहे आपण माझ्या विनंतीचा स्वीकार कराल’, अशी विनंती राज ठाकरेंनी केलीये.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT