Anjali Damania : ‘शिंदे-फडणवीसांनी भुजबळांना पैसै देण्यास भाग पाडले’, फर्नांडिसांना का द्यावे लागले साडे आठ कोटी?

मुंबई तक

ADVERTISEMENT

anjali damania big revealation about fernandez case chhagan bhujbal devendra fadnavis ekanath shinde
anjali damania big revealation about fernandez case chhagan bhujbal devendra fadnavis ekanath shinde
social share
google news

Anjali Damania Big revealation about fernandez case : अभिजीत करंडे  :  राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी फर्नांडीस (fernandez case) कुटुंबियांच घर लाटल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया (Anjali Damania) यांनी केला होता. या प्रकरणात फर्नांडिस कुटुंबियांना न्याय मिळवून देण्यासाठी अंजली दमानिया तब्बल 20 वर्ष लढा दिला होता. अखेर या प्रकरणात राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भुजबळांना समज देऊन पैसै देण्यास भाग पाडल्यामुळे या लढ्याला यश आल्याचा खळबळजनक खुलासा अंजली दमानिया यांनी केला आहे. त्यामुळे आता शिंदे-फडणवीसांमुळे फर्नांडिस कुटुंबियांना आता साडे आठ कोटीची रक्कम मिळाली आहे. दरम्यान हे नेमके प्रकरण काय आहे? हे जाणून घेऊयात. (anjalai damania big revealation about fernandez case chhagan bhujbal devendra fadnavis ekanath shinde)

सांताक्रूझमध्ये फर्नांडिस कुटुंबियांचा एक बंगला होता. तो 1994 ला रहेजाला पुनर्बाधणी करायला दिला होता. त्या बंगल्याच्या बदल्यात फर्नांडिस कुटुंबियाला पाच फ्लॅट मिळणार होते. मात्र फर्नांडिस कुटुंबियांच्या जागेवर छगन भुजबळांनी निवासस्थान बांधले होते. या जागेच्या मोबदल्यात भुजबळांनी फर्नांडिस कुटुंबियांना एक रूपयाचा मोबदला दिला नसल्याचा आरोप अंजली दमानिया यांनी केला होता. या प्रकरणी नोव्हेंबर महिन्यात अंजली दमानिया यांनी भुजबळांच्या बंगल्याबाहेर पत्रकार परिषद घेण्याचाही इशारा दिला होता. मात्र पोलिसांनी त्यांना अटकाव केला होता. अखेर इतर ठिकाणाहून पत्रकार परिषद घेऊन दमानिया यांनी भुजबळांवर गंभीर आरोप केले होते.

हे ही वाचा :

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

दरम्यान या प्रकरणात आता तब्बल 20 वर्षानंतर फर्नांडिस कुटुंबियाला न्याय मिळाला आहे. अंजली दमानिया यांनी फेसबूक पोस्ट लिहून याबाबतची माहिती दिली आहे. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी भूजबळांना समज देऊन पैसै देण्यास भाग पाडल्याचा खुलासाही अंजली दमानिया यांनी केला आहे. अंजली दमानिया यांनी यावेळी फर्नांडिस यांच्या पासबूकचा फोटोही शेअर केला आहे. या फोटोत 14 डिसेंबरला 4 कोटी आणि 18 डिसेंबरला 4 कोटी 41 लाख 50 हजार बँकेत जमा झाल्याचे सांगितले आहेत. त्यामुळे शिंदे-फडणवीसांमुळे तब्बल साडे आठ कोटी फर्नांडिस कुटुंबियांना मिळाले आहेत. दमानिया यांनी शिंदे-फडणवीसांचे आभार मानले आहे.

या प्रकरणात अंजली दमानिया यांना सुप्रिया सुळे यांनी देखील मदत केली होती. पवार कुटुंबाबाबत माझी टोकाची भूमिका होती. मात्र या प्रकरणात राजकारण बाजूला ठेवून सुप्रिया सुळे यांनी माझी मदत केली आहे, त्यामुळे त्यांचे खूप मनापासून आभार असे अंजली दमानिया यांनी सांगितले. तसेच भ्रष्टाचाराविरुद्ध अनेक लढे लढले, पण या लढ्यातून खूप समाधान मिळाल्याचे देखील अंजली दमानिया सांगतात.

ADVERTISEMENT

हे ही वाचा : Lok Sahba 2024 Seat : ‘मनाने अजित पवारांसोबत’, शिरसाटांच्या दाव्यावर जयंत पाटलांनी सोडलं मौन

तसेच गेली अनेक वर्ष फर्नांडिस कुटुंबाला न्याय देण्यासाठी लढा दिला होता. अखेर भुजबळ कुटुंबाने त्यांचे देणे तब्बल 2O वर्षांनी परत केले आहे. त्यामुळे फर्नांडिस कुटुंबाला त्यांचे पुर्ण पैसै मिळाले आहेत. आता 78 वर्षाच्या त्या आईला आता तिच्या मुलांच्या भविष्याची काळजी करावी लागणार नाही, असे अंजली दमानिया म्हणाल्या आहेत.

ADVERTISEMENT

समीर भुजबळ काय म्हणाले?

दरम्यान मध्यंतरी समीर भुजबळ यांनी पत्रकार परिषद घेऊन दमानियांच्या आरोपांवर प्रत्युत्तर दिले होते. सांताक्रूझ मधील ती जागा ही बॉम्बे ख्रिश्चन ट्रस्टच्या मालकीची असून फ्रान्सिस फर्नांडिस हे लिझ होल्डर म्हणजे मालक होते. यांनी त्यांच्या मुलीला लिझचे हक्क श्रीमती शैला यांना दिले होते. म्हणजेच त्या या जागेच्या खऱ्या मालक होत्या व त्यांनी सदर जागेसंबंधी हक्क त्यांचे भाऊ श्री व सौ फर्नांडिस यांना दिले होते.

या प्रकरणी कोर्टात फर्नांडिस कुटुंबीयांनी कन्सेंट टर्म्स फाईल करून सर्वप्रथम मेसर्स पाल्म शेल्टर्स या रहेजा बंधूंच्या कंपनीसोबत व्यवहार केला होता. मात्र त्यांनी 10 वर्षे काहीही काम केले नसल्यामुळे फर्नांडिस दांपत्य हे नव्या डेव्हलपर्सच्या शोधात होते. त्यासाठी त्यांना फ्रेडरिक नरोणा या सोसायटीच्या सचिवांना नवीन डेव्हलपर शोधण्यासाठी विनंती केली होती. त्यानुसार आमच्या मेसर्स परवेश कन्स्ट्रक्शन या कंपनीच्या ते संपर्कात आले.

हे ही वाचा :New Hit And Run Law: ट्रक चालकांनी पोलिसांना पळवून-पळवून मारलं, नवी मुंबईत हायवेवर तुफान राडा

त्यानंतर त्यांनी हा सर्व विषय मांडल्यानंतर फर्नांडिस कुटुंबियांना त्याच सोसायटीमध्ये इतरत्र फ्लॅट्स देण्याच्या करारानुसार आमच्या कंपनीने सर्व मोबदला हा मेसर्स पाल्म शेल्टर्स व फ्रेडरिक नरोणा यांना दिला होता. त्या बदल्यात सदर जागेसंबंधी सर्व हक्क आमच्या कंपनीला मिळाले होते. मोबदला दिल्यानंतर सप्टेंबर 2003 मध्ये श्री व सौ फर्नांडिस ह्यांनी आमच्या परवेश कन्स्ट्रक्शन ह्या कंपनीच्या नावे रजिस्टरही केले होते. मात्र 2005 मध्ये आम्ही बांधकामाला सुरुवात केल्यानंतर आमचे फ्रेडरिक नरोणा यांच्याबरोबर पटत नसल्याचे कारण सांगत तो करार रद्द करावा अशी भूमिका घेण्यात आली. आम्ही फ्रेडरिक नरोणा ह्यांच्याशी संपर्क केला असता त्यांचे बांधकाम सुरु आहे व लवकरच त्यांना पझेशन देण्यात येईल असे सांगण्यात आले. मात्र फेड्रिक नारोणा यांच्याकडून फ्लॅट घेण्याबाबत फर्नांडिस कुटुंबीयांनीच नकार देण्यात आला.

त्यानंतरही आम्ही त्यांचे कोणतेही देणं लागत नसताना माणुसकीच्या नात्याने फर्नांडिस कुटुंबीयांशी आम्ही वारंवार संपर्क केला होता. 2014 साली त्यांनी समक्ष भेटून फ्लॅटच्या मोबदल्यात त्यांना पैसे देण्याचे आम्ही मान्य आणि त्यांनी देखील ते मान्य केले. त्यासाठी बॉम्बे ख्रिश्चन ट्रस्टला पत्रही देण्यात आले की, परवेश कन्स्ट्रक्शन या कंपनीच्या नावे लिझ ट्रान्सफर करावी. मात्र त्यावेळेस देखील फर्नांडिस यांनी व्यवहार पूर्ण केला नाही आणि त्यावेळी पुन्हा पैसे घेण्यास नकार देण्यात आला.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT