Maharashtra Cabinet Expansion: मंत्रिमंडळ विस्ताराच्यावेळी संजय शिरसाटांना फोन गेला होता, पण...

संजय शिरसाट, हे साधं नाव नाही, शिवसेनेतलं मोठं नाव, त्यातल्या त्यात औरंगाबादमध्ये शिरसाटांच्या कार्यकर्त्यांचा मोठा वर्ग आहे.
Maharashtra Cabinet Expansion
Maharashtra Cabinet Expansion

औरंगाबाद: संजय शिरसाट, हे साधं नाव नाही, शिवसेनेतलं मोठं नाव, त्यातल्या त्यात औरंगाबादमध्ये शिरसाटांच्या कार्यकर्त्यांचा मोठा वर्ग आहे. ते ठाकरे गटात असोत की शिंदे गटात चर्चेत राहणार म्हणजे राहणारच. एकनाथ शिंदेंनी बंड केलं, त्यात सगळ्यात आधी नाव होतं ते म्हणजे संजय शिरसाटांचं. शिंदे गटातून उद्धव ठाकरेंना थेट चॅलेंज देणारा नेता म्हणून पहिल्यांदा संजय शिरसाट समोर आले. नंतर अनेकांनी उद्धव ठाकरेंवर नाराजी व्यक्त केली. पण सुरुवात केली ती शिरसाटांनीच.

मंत्रिमंडळ विस्ताराच्यावेळी संजय शिरसाटांनाही फोन गेला होता, पण...

आता याच शिरसाटांचं नाव मंत्रिमंडळाच्या यादीवरुनही चर्चेत होतं. शिंदे सरकारचा छोटासा मंत्रिंमडळ विस्तार झाला. या विस्ताराच्यावेळी संजय शिरसाटांनाही फोन गेला होता, तो फोन मंत्रीमंडळात वर्णी लागल्याचा होता की समजूतीचा होता, हे सांगणं कठिण आहे, मात्र त्या फोननंतर जो काही गदारोळ झाला, त्यामुळे संजय शिरसाटांना नाहक त्रास सहन करावा लागला.

Maharashtra Cabinet Expansion
Nitin Gadkari: ''चंद्रशेखर बावनकुळेंनी बायकोसुद्धा पळवून आणली होती''

मी कॅबिनेटमंत्री आणि पालकमंत्र्यांची मागणी केली आहे- संजय शिरसाट

औरंगाबादेत पत्रकारांशी बोलताना संजय शिरसाटांनीच हा खुलासा केला आहे. पहिल्या मंत्रिमंडळ विस्तारात वर्णी लागता लागता राहिली, मात्र मी कॅबिनेटमंत्री आणि पालकमंत्र्यांची मागणी केलेये, असं रोखठोक संजय शिरसाट हे पत्रकारांना सांगतांना दिसत आहेत. आता त्यांची दुसऱ्या मंत्रिमंडळ विस्तारात तरी वर्णी लागणार का आणि शिरसाटांनी मागितलेल्या गोष्टी त्यांना मिळणार का, हे पाहणं गरजेचं आहे.

मंत्रिमंडळ विस्ताराच्या वेळी एकनाथ शिंदेंशी खडाजंगी झाल्याची चर्चा

शिंदे सरकारच्या बहुप्रतिक्षित मंत्रिमंडळ विस्तार पार पडला. शिंदे गटातून ९ मंत्र्यांनी तर भाजपमधून ९ मंत्र्यांनी शपथ घेतली. यावेळी शिंदे गटातून अनेकांची नावं चर्चेत होती. संजय शिरसाटांचं मंत्रिपद फिक्स होतं अशीही चर्चा होती परंतु शेवटच्या क्षणी अब्दुल सत्तार यांचं नाव यादीत टाकलं गेलं. त्यामुळे सह्याद्री हाऊसमध्ये झालेल्या बैठकीत एकनाथ शिंदे आणि संजय शिरसाट यांच्यात खडाजंगी झाल्याची माहिती सुत्रांनी दिली होती.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in