MLC Election Result: फडणवीस उतरले मैदानात, तरीही ‘मविआ’ने नागपूर मिळवलं!

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

Big blow to Devendra Fadnavis in Nagpur: नागपूर: एकीकडे कोकणात (Konka) महाविकास आघाडीला (Mahavikas Aghadi) पराभवाचा धक्का सहन करावा लागलेला असतान दुसरीकडे नागपूरमध्ये (Nagpur) मात्र महाविकास आघाडीने जोरदार मुसंडी मारली आहे. खरं तर नागपूर हा भाजपचा (BJP) आणि देवेंद्र फडणवीसांचा (Devendra Fadnavis) बालेकिल्ला आहे. मात्र, तरीही नागपूर शिक्षक मतदारसंघातून (Nagpur Teachers Constituency) महाविकास आघाडीचे सुधाकर अडबाले (Sudhakar Adbale) यांनी दणदणीत विजय मिळवला आहे. त्यांनी भाजपचे दोन टर्म आमदार असलेल्या नागो गाणार (Nago Ganar) यांचा मोठा पराभव केला आहे. अडबालेंच्या विजयानंतर त्यांच्या समर्थकांनी नागपुरात प्रचंड जल्लोष केल्याचं पाहायला मिळत आहे. (big blow to devendra fadnavis in nagpur teachers constituency bjp candidate defeated mva candidate won)

नागपूर विभाग शिक्षक मतदार संघात झालेल्या निवडणुकीत एकूण 34 हजार 360 जणांनी मतदान केलं होतं. ज्यामध्ये 1409 मत अवैध ठरली. तर 32951वैध मातांपैकी सुधाकर अडबाले यांना 16700, नागो गाणार यांना 8211, राजेंद्र झाडेंना 3403 मतं मिळाली.

हे मतदान पसंती क्रमानुसार असल्याने त्याचा कोटा 16477 एवढा निश्चित झाला होता. त्यानुसार सुधाकर अडबाले यांना 16700 पहिल्या पसंतीच्या मते मिळवून नागपूर शिक्षक मतदार संघात मोठा विजय मिळवला.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

पाहा सुधाकर अडबाले नेमकं काय म्हणाले?

दरम्यान, मोठं मताधिक्य घेऊन अडबाले यांनी विजयी आघाडी घेतल्यानंतर माध्यमांशी देखील संवाद साधला. पाहा ते नेमकं काय म्हणाले:

‘शिक्षण क्षेत्रात जो बदल आवश्यक होता, शिक्षकांच्या अनेक समस्या मागील 12 वर्षांपासून प्रलंबित होत्या. त्यामुळे या समस्या सोडविण्यासाठी विदर्भ माध्यमिक शिक्षण संघटनेने मला अधिकृत उमेदवार म्हणून जाहीर केलं. दोन वर्षांपासून आम्ही प्रचाराला सुरुवात केली. तर महाविकास आघाडीने मला पुरस्कृत केलं.’

ADVERTISEMENT

‘महाविकास आघाडीतील घटक पक्षाच्या नेते मंडळींनी एकत्र येऊन येथे काम केलं. त्यामुळे हा एकजुटीचा विजय झाला आहे.’

ADVERTISEMENT

MLC Election Result: तांबे की पाटील? अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष नाशिककडे

‘मागील 10 वर्षांपासून या राज्यातील कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी यासाठी आम्ही लढत होतो. अनेक तीव्र आंदोलनं आम्ही केली आहेत. हाच मुद्दा घेऊन सभागृहात आम्ही निश्चितच लढू. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं की, राज्यातील कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करूच शकत नाही. परंतु ज्या-ज्या राज्यांमध्ये काँग्रेस समर्थित सरकार आहे त्या राज्यांनी जुनी पेन्शन योजना लागू करण्याचं मान्य केलं आहे. विद्यमान प्रतिनिधी ज्या पक्षाचं समर्थन घेऊन लढत होते त्या पक्षाची भूमिका आहे की, जुनी पेन्शन देऊच शकत नाही. त्यामुळेच या ठिकाणी त्यांचा पराभव झाला आहे.’

‘पहिल्या फेरीमध्ये 28 हजार मतांची मोजणी झाली. त्यात 14 हजार 069 मते सुधाकर अडबाले यांना मिळाले आहेत. याच मताधिक्याच्या जोरावर सुधाकर अडबालेंचा विजय झाला आहे.’

‘मागील दोन टर्म नागपूर शिक्षक मतदारसंघ हा भाजपच्या ताब्यात होत्या. नागो गाणार हे दोनदा टर्म आमदार होते. परंतु अँटीइन्कम्बंसी असतानाही त्यांना तिसऱ्यांदा पक्षाने उमेदवारी दिली होती.’

‘या निवडणुकीत सर्वाधिक महत्त्वाचा मुद्दा हा जुन्या पेन्शन योजनेचा होता. हाच मुद्दा नागो गाणार यांच्या पराभवासाठी कारणीभूत ठरला आहे.’ अशी प्रतिक्रिया सुधाकर अडबाले यांनी दिली आहे.

MLC Election Results 2023 Live Updates: नागपुरात मविआ उधळणार गुलाल!

दुसरीकडे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी या विजयानंतर ट्विटरवरुन भाजपवर निशाणा साधला आहे.

‘भाजपच्या मातृसंस्थेच्या बालेकिल्ल्यातच महाविकास आघाडीचा भाजपला दणका. नागपूर शिक्षक मतदारसंघातून महाविकास आघाडीचे सुधाकर अडबाले विजयी.’ असं ट्विट नाना पटोले यांनी केलं आहे.

देवेंद्र फडणवीसांना मोठा धक्का

नागपूर हा खरं तर देवेंद्र फडणवीस यांचा बालेकिल्ला समजला जातो. मात्र, असं असताना देखील शिक्षक मतदारसंघात भाजप उमेदवाराचा पराभव हा फडणवीसांसाठी मोठा धक्का समजला जात आहे.

कोण आहेत सुधाकर अडबाले?

सुधाकर अडबाले हे विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे नेते असून मूळचे चंद्रपूर जिल्ह्यातले आहेत. गणिताचे शिक्षक असलेले अडबाले सुरुवातीपासूनच काँग्रेस विचाराच्या विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाशी जुळलेले आहेत. गेले अनेक वर्ष ते या निवडणुकीची तयारी म्हणून शिक्षकांसाठी काम करत होते.

जुन्या पेन्शन योजनेसाठी त्यांनी अनेक आंदोलन केली असून विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या वेळेला मोठा मोर्चा काढून त्याचे नेतृत्व केले होते. जरी महाविकास आघाडी आणि काँग्रेसने त्यांना पाठिंबा जाहीर करण्यासाठी खूप उशीर लावला असला, तरी अडबाले आधीपासूनच सर्व तयारी करून होते. परिस्थितीचा अंदाज घेऊनच काँग्रेसने आणि महाविकास आघाडीने त्यांना अखेरच्या क्षणी पाठिंबा जाहीर केला.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT