मोठी बातमी! देवेंद्र फडणवीस राज्यपाल भगतसिंह कोश्यारींच्या भेटीला राजभवनावर

मुंबई तक

विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे काही वेळापूर्वीच राजभवनावर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या भेटीला पोहचले आहेत. आत्ताच्या घडीची ही सर्वात मोठी बातमी आहे. उद्धव ठाकरे सरकारविरोधात त्यांच्याच पक्षातल्या आमदारांनी बंड पुकारलं आहे. एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबतच्या ५१ आमदारांनी बंड पुकारलं आहे तसंच आम्ही पाठिंबा काढणार आहोत असं त्यांनी म्हटलं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राजकीय भूकंपानंतर […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे काही वेळापूर्वीच राजभवनावर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या भेटीला पोहचले आहेत. आत्ताच्या घडीची ही सर्वात मोठी बातमी आहे. उद्धव ठाकरे सरकारविरोधात त्यांच्याच पक्षातल्या आमदारांनी बंड पुकारलं आहे. एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबतच्या ५१ आमदारांनी बंड पुकारलं आहे तसंच आम्ही पाठिंबा काढणार आहोत असं त्यांनी म्हटलं आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राजकीय भूकंपानंतर दोनदा राजीनामा देणार होते पण पवारांनी थांबवलं

महाराष्ट्रात २१ जूनला एकनाथ शिंदे यांनी सर्वात मोठं बंड पुकारलं आहे. त्यानंतर राज्यात मोठा राजकीय भूकंप झाला आहे. आता जी माहिती मिळते आहे त्यानुसार देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील, प्रवीण दरेकर यांच्यासह दिग्गज नेते राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या भेटीला पोहचले आहेत. सरकार अल्पमतात आलं आहे त्यांना आता लवकरात लवकर फ्लोअर टेस्ट घेतली जावी ही मागणी करत फडणवीस हे राज्यापलांकडे पोहचले आहेत.

राज्यात जो पेच निर्माण झाला आहे त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे राजीनामा देतील असं वाटलं होतं. त्यांनी तसं ठरवलंही होतं मात्र त्यांनी राजीनामा दिला नाही. उलट बंडखोर आमदारांना परतण्याचं आवाहन करत आज उद्धव ठाकरे यांनी कॅबिनेटची मिटिंगही घेतली. कॅबिनटेच्या बैठकीत राजीनामा देणार नाही हेदेखील त्यांनी सांगितलं. तसंच उद्याही एका मिटिंगची घोषणा करण्यात आली असून उद्या औरंगाबादचं नामकरण संभाजी नगर केलं जाण्यासा मंजुरी मिळू शकते असंही जाहीर करण्यात आलं आहे. त्या पार्श्वभूमीवर विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आता हे आता राज्यपालांच्या भेटीला पोहचले आहेत.

हे वाचलं का?

    follow whatsapp