'टिल्ल्या लोकांनी असलं काही...', अजित पवारांकडून नितेश राणेंची हेटाळणी

Ajit Pawar vs Nitesh Rane: संभाजीराजेंच्या मुद्द्यावरुन भाजप आमदार नितेश राणेंनी राष्ट्रवादीवर जोरदार टीका केली होती. याच टीकेला प्रत्युत्तर देताना अजित पवारांनी नितेश राणेंची अक्षरश: हेटाळणी केली आहे
अजित पवार यांनी केली नितेश राणेंची हेटाळणी
अजित पवार यांनी केली नितेश राणेंची हेटाळणी

Ajit Pawar vs Nitesh Rane: मुंबई: विरोधी पक्ष नेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी संभाजी महाराज (Sambhaji Maharaj) धर्मवीर नाहीत या त्यांनी केलेल्या वक्तव्यावरुन राज्यात सध्या बरेच राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. अशातच अजित पवारांनी आज (4 डिसेंबर) पत्रकार परिषद घेऊन पुन्हा एकदा आपण आपल्या मतावर ठाम असल्याचं म्हटलं. मात्र, आपल्या याच पत्रकार परिषदेत जेव्हा अजित पवारांना आमदार नितेश राणेंनी (Nitesh Rane) केलेल्या टिकेवर प्रतिक्रिया विचारण्यात आली तेव्हा अजित पवारांनी 'टिल्ल्या' असं म्हणत त्यांच्या टीकेची एकप्रकारे हेटाळणीच केली. (bjp mla nitesh rane mocked by ncp leader ajit pawar in mumbai press conference)

अजित पवारांची नितेश राणेंवर बोचरी टीका

'मोठे पवार साहेब कधीही शिवाजी महाराजांच्या नावाचा उल्लेख करत नाहीत. ते आजवर कधी रायगडावर देखील गेलेले नाहीत. तिथेही कधी नतमस्तक झालेले नाहीत.' अशी टीका नितेश राणेंनी केली होती. याबाबत जेव्हा अजित पवारांना त्यांची प्रतिक्रिया विचारण्यात आली तेव्हा पाहा ते नेमकं काय म्हणाले.

'टिल्ल्या लोकांनी असलं काही सांगायचं कारण नाही. त्यांची उंची किती, त्यांची झेप किती... त्यांना मी कशाला उत्तर देऊ. माझे बाकीचे प्रवक्ते वैगरे देतील उत्तर. असल्यांच्या नादी लागत नसतो मी.' असं म्हणत अजित पवारांनी नितेश राणेंच्या टीकेकडे दुर्लक्ष करा असं म्हटलं आहे.

अजित पवार यांनी केली नितेश राणेंची हेटाळणी
Ajit Pawar: अजित पवार पुन्हा तेच म्हणाले, 'संभाजीराजे धर्मवीर नाहीच..'

नितेश राणेंनी नेमकी काय केली होती टीका?

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी औरंगजेबाबाबत केलेल्या वक्तव्यावरुन नितेश राणेंनी एक पत्रक लिहून राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार आणि अजित पवारांवर टीका केली होती. पाहा या पत्रात नेमकं काय लिहलं होतं.

जितेंद्र आव्हाड आपण औरंग्याबाबत 'औरंगजेब क्रूर असता तर विष्णूचं मंदिरही तोडलं असतं ना?' असे केलेले वक्तव्य स्वाभाविकच आहे. कारण आपले सर्वस्व यांची श्रद्धा औरंगजेबावर आहे हे केव्हाच सिद्ध झाले आहे.

अजित पवार यांनी केली नितेश राणेंची हेटाळणी
Ajit Pawar: शरद पवारांनी पिळले कान, अजित पवार मागणार माफी?

कारण त्यांनी आपल्या तहआयुष्यात कधीही आमच्या हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीवर एकदाही नतमस्तक केले नाही किंवा रायगडाच्या दिशेने त्यांचे कधी पाय वळले नाही.

काकाप्रमाणे पुतण्याही हिंदू धर्मासाठी आपल्या प्राणाची आहुती देणारे छत्रपती संभाजी महाराज हे 'धर्मवीर' नाहीत असे घोषित करतो.

औरंगजेबाने धर्मांतर करण्यासाठी संभाजी महाराजांना नरक यातना दिल्या तरी धर्मवीर संभाजी महाराजांनी हिंदू धर्मासाठी बलिदान दिले.

आपल्या माहितीकरता मी आपल्याला या पत्रासोबत औरंग्याने तोडलेल्या हिंदू मंदिरांची यादी देत आहे. मला खात्री आहे आपण हे तथ्य आपल्या मुघलशाहीच्या आस्थेपोटी स्वीकारणार नाही.

अशा शब्दात नितेश राणे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका केली होती.

Related Stories

No stories found.
logo
Mumbai Tak
www.mumbaitak.in