शिवसैनिकांना रश्मीवहिनींच्या अश्रूंची शपथ घालणाऱ्या शीतल म्हात्रे एकनाथ शिंदे गटात
मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. शिवसेनेत बंडखोरी झाल्यानंतर ज्या शीतल म्हात्रेंनी शिवसैनिकांना रश्मीवहिनींच्या अश्रूंची शपथ घातली होती त्याच शीतल म्हात्रे आता शिंदे गटात सहभागी झाल्या आहेत. गेल्या काही दिवसांपासून उद्धव ठाकरेंशी निष्ठावान राहिलेल्या शीतल म्हात्रे शिंदे गटात गेल्याने एकच खळबळ उडाली आहे. आज शितल म्हात्रे यांनी एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी जात […]
ADVERTISEMENT

मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. शिवसेनेत बंडखोरी झाल्यानंतर ज्या शीतल म्हात्रेंनी शिवसैनिकांना रश्मीवहिनींच्या अश्रूंची शपथ घातली होती त्याच शीतल म्हात्रे आता शिंदे गटात सहभागी झाल्या आहेत. गेल्या काही दिवसांपासून उद्धव ठाकरेंशी निष्ठावान राहिलेल्या शीतल म्हात्रे शिंदे गटात गेल्याने एकच खळबळ उडाली आहे.
आज शितल म्हात्रे यांनी एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी जात शेकडो कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांची भेट घेतली. मुंबई महापालिका निवडणुका कधीही जाहीर होण्याची शक्यता आहे. शिवसेनेचा गड मानल्या जाणाऱ्या बीएमसीतील सत्ता राखण्याचं कडवं आव्हान सेनेसमोर आहे. आतापर्यंत ठाणे, कल्याण डोंबिवली यासारख्या एकनाथ शिंदेंचं प्राबल्य असलेल्या महापालिकेतील नगरसेवकांनी शिंदे गटात उडी घेतली होती. परंतु मुंबई महापालिकेतून शिंदेंच्या गटात जाणाऱ्या म्हात्रे या पहिल्याच नगरसेविका ठरल्या आहेत. त्यामुळे म्हात्रेंनी वात पेटवल्यानंतर आणखी कोण त्यांच्यापाठी जाणार, याची चर्चा रंगली आहे.
शितल म्हात्रे यांच्या भेटीनंतर एकनाथ शिंदे यांचं ट्विट
मुंबई येथील दहिसर विभागातील माजी नगरसेविका शितल मुकेश म्हात्रे यांनी आज वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे तसेच धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या विचारांना प्रमाण मानून हिंदुत्वाचा विचार स्वीकारून आम्हाला साथ देण्याचा निर्णय घेतला.