एकनाथ शिंदेंना स्वतःच्या हातून ट्विट तरी करता येतं का?- विनायक राऊत
रत्नागिरी: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी ट्विटरच्या माध्यमातून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला होता. “रिक्षाच्या स्पीडपुढे मर्सिडीजचा स्पीड फिका पडला…कारण हे सर्वसामान्यांचं सरकार!!” असं ट्विट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल केलं होतं. उद्धव ठाकरेंना एकप्रकारे त्यांनी टोला लगावला होता. यावरून शिवसेना खासदार आणि सचिव विनायक राऊत (Vinayak Raut) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे […]
ADVERTISEMENT

रत्नागिरी: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी ट्विटरच्या माध्यमातून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला होता. “रिक्षाच्या स्पीडपुढे मर्सिडीजचा स्पीड फिका पडला…कारण हे सर्वसामान्यांचं सरकार!!” असं ट्विट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल केलं होतं. उद्धव ठाकरेंना एकप्रकारे त्यांनी टोला लगावला होता. यावरून शिवसेना खासदार आणि सचिव विनायक राऊत (Vinayak Raut) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर पलटवार केला आहे.
‘एकनाथ शिंदे यांच्या विदवत्तेबद्दल संशोधन करावं लागेल, कुणीतरी लिहून द्यायचं आणि ट्वीट करायचं, त्यांना स्वतःच्या हातून ट्विट तरी करता येतं का? याचा मला अभ्यास करावा लागेल, अशी टीका विनायक राऊत यांनी केली आहे. ते आज रत्नागिरीमध्ये पत्रकार परिषदेत बोलत होते. त्यात विनायक राऊत यांनी टीका केली.
एकनाथ शिंदेंनी आई-वडिलांची शपथ घेऊन सांगावं की…
एकनाथ शिंदे यांना माझ्या मध्यस्थीमुळे विधानसभेची उमेदवारी मिळाली. त्यावेळी मी ठाण्याचा संपर्कप्रमुख होतो. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना नेते सतीश प्रधान यांना ए बी फॉर्म दिला होता, पण मी मध्यस्थी केली आणि एकनाथ शिंदे यांना पहिल्यांदा आमदारकीची उमेदवारी मिळाली. पण त्याचा आता मला पश्चाताप होतो आहे, आयुष्यातील मोठ पाप झालं आहे. मी सांगितलं नसतं तर एकनाथ शिंदेना आमदारकी मिळाली नसती. त्यामुळे एकनाथ शिंदे पहिल्या वेळी आमदार कोणामुळे झाले हे त्यांनी आपल्या आई-वडिलांची शपथ घेऊन सांगावं असं राऊत यावेळी म्हणाले.