‘उद्धवजी तुमची गत….’, पंतप्रधान मोदींच्या एकेरी उल्लेखानंतर बावनकुळे संतापले

मुंबई तक

ADVERTISEMENT

chandrashekhar bawankule reply uddhav thackeray
chandrashekhar bawankule reply uddhav thackeray
social share
google news

Chandrashekhar Bawankule Reply Uddhav Thackeray : माजी मुख्यमंत्री आणि शिवसेनेच्य़ा ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी रविवारी पार पडलेल्या जळगावमधल्या पाचोरा येथील सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांचा एकेरी उल्लेख करत त्यांच्यावर सडकून टीका केली होती.या टीकेवर आता भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule)चांगलेच संतापले आहेत. बावनकुळे यांनी उद्धव ठाकरे यांचे नाव सन्मानाने घेत, तुमची गत काय झालीय? अशी आठवण करून देत सडकून टीका केली.(chandrashekhar bawankule reply uddhav thackeray on single mention pm narendra modi)

चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule)यांनी ट्विट करून उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. ”मोदीच्या मागे- पुढे कुणी नाही” असा ठाकरेंनी केलेल्या विधानाचा ट्विटमध्ये पुनरूच्चार करत बावनकुळे म्हणाले, उद्धवजी,आपण हे विसरलात की, पंतप्रधान मोदी यांच्यासोबत देशातील कोट्यवधी जनतेचे आशीर्वाद आहेत. हा देशच त्यांचे कुटुंब आहे. लहानपणीच कुटुंबाचा त्याग केलेल्या माणसाला कुटुंबाचा मोह कसा राहणार ? कुटुंबाच्या मोहात तर तुम्ही अडकला आहात,अशी टीका त्यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर केली. आणि म्हणूनच तुमच्या जवळची माणसे सोडून गेली आणि तुमची ही गत झाल्याची आठवण यावेळी बावनकुळे यांनी यावेळी करून दिली.

हे ही वाचा  : “अशा घुशी खूप पाहिल्या, आता शेपटीला धरायचं अन्…” : गुलाबरावांच्या आव्हानाला ठाकरेंचं प्रत्युत्तर

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

उद्धव ठाकरे काय म्हणाले?

जळगावच्या सभेत उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) म्हणाले होते की, माझ्यावर आरोप करतात की मी घरी बसून सरकार चालवलं. पण मी घरी बसून ज केलं ते तुम्ही वणवण फिरून करू शकला नाहीत, अशी टीका त्यांनी यावेळी केली. तसेच मी घरी बसून महाराष्ट्र सांभाळत होतो म्हणून ही जनता इथे आली आहे.

हे ही वाचा  : ठाकरेंच्या हस्ते पुतळ्याच अनावरण, सभेतही आठवणीने भावूक… कोण होते आर. ओ. पाटील?

पुढे उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी घऱाणेशाहीवर बोलताना मोदींवर टीका केली. घराणेशाहीला एक परंपरा असते.तुला आगे ना पिछे, तुला कोणी नाहीये,कधी झोळी लटकवशील आणि निघून जाशील. पण माझ्या जनतेच्या हातात भिकेचा कटोरा देऊन जाशील त्याचं काय करायचं? ते म्हणताता ना, मी फकीर आहे,मग झोळी लटकवून निघून जाशील,पण माझ्या जनतेच्या हातात भिकेचा कटोरा देऊन जाशील त्याचं काय करायचं,असा एकेरी उल्लेख करत त्यांनी टीका केली होती. या टीकेनंतर भाजप चांगलीच आक्रमक झाली आहे.

ADVERTISEMENT

गुलाबराव पाटलांना प्रत्युत्तर

“आम्ही दगडे मारून सभा बंद करणारे लोकं आहोत, त्यामुळे आम्हाला चॅलेंज करू नये”, असं थेट आव्हान गुलाबराव पाटील यांनी उद्धव ठाकरे यांना दिले होते. गुलाबराव पाटील यांच्या आव्हानाला आता उद्धव ठाकरे यांनी प्रत्युत्तर दिले.काही जणांना वाटलं होतं, तेच म्हणजे शिवसेना. आम्ही सभेत घुसणार म्हणे. अशा घुशी खूप पाहिल्या, पण अशा घुशींच्या शेपटीला धरुन त्यांना निवडणुकीत आपटायचं आहे, असं म्हणतं उद्धव ठाकरे यांनी शिवसेना नेते आणि मंत्री गुलाबराव पाटील यांच्या आव्हानावर प्रत्युत्तर दिलं.

ADVERTISEMENT

हे ही वाचा  : शिंदे सरकार 15 दिवसांत कोसळणार? राऊतांच्या दाव्यावर अजितदादांची सावध बॅटिंग

    follow whatsapp

    ADVERTISEMENT