…अन् केशवराव धोंडगेंमुळे बाळासाहेब ठाकरेंची अटक टळली; छगन भुजबळांनी सांगितला तो किस्सा

मुंबई तक

माजी खासदार केशवराव धोंडगे यांनी १७ जुलै रोजी वयाची शंभरी पूर्ण केली. यानिमित्ताने विधानसभेत छगन भुजबळ यांनी त्यांच्याबद्दलच्या आठवणींना उजाळा दिला. केशवराव धोंडगे हे पंतप्रधानांनाही ठणकावून सांगणारं व्यक्तिमत्त्व आहे, अशा शब्दात भुजबळांनी त्यांच्याबद्दल भावना व्यक्त केल्या. यावेळी बाळासाहेब ठाकरे यांची अटक कशी केशवराव धोंडगे यांच्यामुळे टळली होती, याचाही किस्सा भुजबळ यांनी सभागृहात सांगितला. छगन भुजबळ […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

माजी खासदार केशवराव धोंडगे यांनी १७ जुलै रोजी वयाची शंभरी पूर्ण केली. यानिमित्ताने विधानसभेत छगन भुजबळ यांनी त्यांच्याबद्दलच्या आठवणींना उजाळा दिला. केशवराव धोंडगे हे पंतप्रधानांनाही ठणकावून सांगणारं व्यक्तिमत्त्व आहे, अशा शब्दात भुजबळांनी त्यांच्याबद्दल भावना व्यक्त केल्या. यावेळी बाळासाहेब ठाकरे यांची अटक कशी केशवराव धोंडगे यांच्यामुळे टळली होती, याचाही किस्सा भुजबळ यांनी सभागृहात सांगितला.

छगन भुजबळ केशवराव धोंडगेंबद्दल काय म्हणाले?

विधानसभेत बोलताना छगन भुजबळ म्हणाले, “शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते, माजी खासदार केशवराव धोंडगे यांची वादळी कारकीर्द महाराष्ट्राने पाहिलीये. त्यांनी वयाची शंभर वर्ष पूर्ण केलीये. कायम आपल्या पक्षाबरोबर राहणारे, परखड भूमिका, अभ्यासू भाषणं आणि त्याला आंदोलनाची जोड देणारे, सरकार कुणाचंही असो सरकारला सळो की पळो करून सोडणारे असे धोंडगेसाहेबांनी १७ जुलैला वयाची १०० वर्ष पूर्ण केली.”

“मन्याड खोऱ्याचा वाघ, अशी त्यांची महाराष्ट्रामध्ये ओळख आहे. मला त्यांच्यासोबत करण्याची संधी मला मिळाली, याचा मला आनंद आहे. बोलायला उभे राहिले की त्यांची तोफ सुरू व्हायची. छत्रपती शिवाजी महाराज, आंदोलनं यावर ते भरभरून बोलायचे. केशवराव धोंडगे हे कधी काय बोलतील आणि कधी काय करतील यांचा नेम नसायचा”, असं छगन भुजबळ सभागृहात म्हणाले.

शरद पवारांचा केशवराव धोंडगे यांनी घेतला होता मुका

“नांदेडमधील एका कार्यक्रमात केशवराव धोंडगे यांनी शरद पवार यांच्या गालाचा मुकाच घेतला. लोकांना वाटलं मुका घेतला, पण भाषण करताना मात्र त्यांनी शरद पवारांविरुद्ध प्रखर टीका केली. लोकांना याचीही कल्पनाही नव्हती. न्यायासाठी काहीही करण्याची त्यांची वृत्ती होती.”

हे वाचलं का?

    follow whatsapp