Chhagan Bhujbal : “सुप्रियांचं नाव येताच प्रफुल पटेल म्हणाले मी राजीनामा देतो”

मुंबई तक

ADVERTISEMENT

mumbaitak
mumbaitak
social share
google news

Sharad Pawar Ajit Pawar : राष्ट्रवादीत झालेल्या बंडाळीनंतर अजित पवार गटाकडून पडद्यामागे घडलेल्या घटना चव्हाट्यावर आणून शरद पवारांना लक्ष्य केलं जात आहे. 5 जुलै रोजीच्या बैठकीत याची सुरूवात केली. त्यानंतर आता येवल्याचे आमदार छगन भुजबळ यांनी सगळा इतिहासाच उकरून काढला आहे. शरद पवारांनी राजीनामा देण्याची घोषणा केल्यानंतर आणि सुप्रिया सुळे यांना कार्याध्यक्ष नियुक्त करण्याच्या दरम्यान नेमकं काय घडलं, याबद्दल भुजबळांनी आणखी एक गौप्यस्फोट केला आहे.

राष्ट्रवादीतील 54 आमदारांच्या सह्याचे पत्र शरद पवारांकडे गेल्यानंतर त्यांनी पवारांचं मन वळवण्याचा प्रयत्न केला. त्याबद्दल सांगताना ते म्हणाले की, “मला जेव्हा कळलं की, हे चाललंय. 54 आमदारांच्या सह्या… त्यात जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड, रोहित पवारही आहेत. मला सांगितलं की, तुम्ही साहेबांशी बोला कारण तुम्ही वरिष्ठ आहात. पुढाकार मी घेतला नाही. मला सांगितलं गेलं. त्यावरून आम्ही सांगितलं.”

राजीनाम्याची घोषणा, प्रफुल पटेलांची भूमिका… भुजबळ काय बोलले?

शरद पवारांनी राजीनाम्याची घोषणापूर्वी काय घडलं, याबद्दल सांगताना भुजबळ म्हणाले, “आम्ही सांगितल्यानंतर काहीतरी ठरलं. मग अजित पवार, सुप्रिया सुळे आणि साहेब त्यांच्याच घरात हे सगळं ठरत गेलं. सह्या घेतल्यानंतर 15 दिवसांनी त्यांनी (शरद पवार) सांगितलं की मी राजीनामा देणार. मग तुम्ही काय करायचं ते करा. पुस्तक प्रकाशनावेळी त्यांनी सांगितलं. हे त्या घोषणेच्या 15 दिवसांपूर्वी त्यांच्याच घरी ठरलं होतं. हे मला स्वतः सुप्रिया सुळेंनी सांगितलं. म्हणून साहेब हे कशाला केलं, मग दुसऱ्या दिवशी मी पुन्हा बोललो की भांडण मिटवा. सुप्रिया सुळेंनी दिल्ली आणि राष्ट्रीय पक्ष बघावा आणि महाराष्ट्रात अजित पवारांनी पाहावं.”

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

वाचा >> ‘भाजप-शिवसेना युती तुटण्यामागे शरद पवारांची डील’; भुजबळांनी टाकला नवा ‘बॉम्ब’

“हे सगळं ठरलं आणि तीन दिवसांनी परत पवारसाहेबांनी माघार घेतली. त्यांनी परत निरोप पाठवला की, सुप्रिया सुळेंना कार्याध्यक्ष म्हणून नियुक्त करायचं आहे. तटकरेंना सांगितलं की, तुम्ही सगळ्यांना बोलवा. मी सांगायला गेलो, तर प्रफुल पटेल म्हणाले की, मी उपाध्यक्ष आहे. दोन नंबर मी आहे. आता मी तीन नंबर कसा काय होणार? मी राजीनामा देतो. मग परत मी समजूत काढली की दोघेही कार्याध्यक्ष व्हा. तुमचं नाव पहिलं घेतील आणि सुप्रिया सुळेंचं दुसरं घेतील. हे सगळं आम्ही मिटवलं”, असा पडद्यामागे घडलेला घटनाक्रम भुजबळांनी समोर आणला.

जयंत पाटील भेटायला गेले अन्…

“एकनाथ शिंदेंच्या मंत्रिमंडळात जायच्या आधी जयंत पाटील, अजित पवार आणि प्रफुल पटेल यांना सांगितलं की, इतके मंत्री पाहिजे, इतके खासदार पाहिजे, इतक आमदार पाहिजे. सगळं लिहून दिलं. त्याप्रमाणे मीटिंग ठरली. बडोद्याला का कुठेतरी. विमानं तयार ठेवली. जायच्या वेळी जयंत पाटील निरोप घ्यायला गेलो की आम्ही जातोय, तर त्यांनी सांगितलं की नका जाऊ”, असा दावाही भुजबळांनी केला. अजित पवारांनी 5 जुलैच्या बैठकीतही हा मुद्दा अधोरेखित केला होता.

ADVERTISEMENT

वाचा >> ‘मी साधुसंत नाही, तर…’, ठाकरेंचा उल्लेख, देवेंद्र फडणवीसांनी काय सांगितलं?

भाजपसोबत सरकार स्थापनेबद्दल तुम्ही घुमजाव केला

“मला कळलं नाही की, 2019 मध्ये तुम्ही सांगितलं की, भाजपसोबत सरकार स्थापन करायचं. अजित पवारांसोबत ते घडले. तुम्ही घुमजाव केला. अजित पवारांनी तो पहाटेचा शपथविधी पार पाडला. हे अजित पवारांनीच सांगितलं. तुम्ही सुद्धा गेलेल्या आमदारांना गोळा करत होतो. या अनेक गोष्टी आहेत. मग माझ्यावर राग काढायचं काय कारण? भुजबळच प्रत्येकवेळी लढत होता”, असं म्हणत भुजबळांनी शरद पवारांना लक्ष्य केले.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT