'काँग्रेस प्रायव्हेट लिमिटेड कंपनीसारखीच; पृथ्वीराज चव्हाणांनी नेतृत्वाला दाखवला आरसा

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांचा काँग्रेसला घरचा अहेर
Congress is like a private limited company Says Prithviraj Chavan
Congress is like a private limited company Says Prithviraj Chavan

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांनी आज काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी दिली. लोकसभा निवडणुका २०२४ ला होणार आहेत. या निवडणुकीच्या आधी काँग्रेसचा ज्येष्ठ नेता त्यांना सोडून जाणं हा धक्का मानला जातो आहे. गुलाम नबी आझाद यांनी पक्ष सोडून जाणं हे दुर्दैवी आहे असं महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलं आहे. तसंच काँग्रेसची अवस्था प्रायव्हेट लिमिटेड कंपनीसारखी झाल्यानेच पराभव होतोय असंही त्यांनी म्हटलं आहे. मुंबई तकला दिलेल्या एक्सक्लुझिव्ह मुलाखतीत ते बोलत होते.

काय म्हटलं आहे पृथ्वीराज चव्हाण यांनी?

लोकशाही पद्धतीने निवडणूक का पक्षात घेतली जात नाही? तुम्ही नेमणूक का करत आहात? एका कुटुंबातले जास्त लोक नकोत हे म्हणत आहात मग राहुल गांधी कुठल्या कुटुंबातले आहेत? काँग्रेस पक्ष वाचवायचा असेल तर काँग्रेसलमधली महत्त्वाची पदं लोकशाही पद्धतीने भरली गेली पाहिजेत. नियुक्तांची संस्कृती आपण थांबवलं पाहिजे.

मोदी शाह यांच्या हुकुमशाही प्रवृत्तीला फक्त काँग्रेस पक्षच देऊ शकतो. मात्र त्यासाठी संघटनात्मक बदल आवश्यक आहेत. तसं झालं नाही तर खरोखरच काँग्रेसमुक्त भारत होऊ शकतो असंही पृथ्वीराज चव्हाण यांनी मुंबई तकला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं आहे. तसं घडलं तर जबाबदार कोण? मोदी जबाबदार आहेतच पण काँग्रेस जबाबदार नाही का? काय झालं आहे पक्ष अजून सरंजामशाही मानसिकेतून बाहेर गेलेले नाहीत.

काँग्रेस पक्ष प्रायव्हेट लिमिटेड कंपनीसारखा झाला

आज आमचा पक्ष इतर पक्षांप्रमाणे प्रायव्हेट लिमिडेट कंपनीसारखा झाला आहे. देशात अनेक पक्ष असे आहेत जे एका कुटुंबाने चालवले आहेत. आज तीच अवस्था काँग्रेसची झाल्याने आमचा पराभव सातत्याने होतो आहे असंही पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलं आहे. तुम्हाला इतकं दिलं, कुणी दिलं? असाही प्रश्न पृथ्वीराज चव्हाण यांनी विचारला आहे.

काँग्रेस पक्षाची एक घटना आहे, त्या घटनेच्या अनुसार आम्ही चाललेलो नाही. आज काँग्रेसचं अध्यक्षपद हवं असेल तर राहुल गांधी यांनी निवडणुकीला उभं रहावं ते निवडूनच येतील. अशाच पद्धतीने त्यांनी राज्यांमध्ये निवडणुका झाल्या पाहिजेत. २४ वर्षांपासून काँग्रेसमध्ये निवडणुका झालेल्या नाहीत. काँग्रेसला एक जिवंत पक्ष करायचं असेल तर निवडणूक झाली पाहिजे. ही मागणी मान्य होईल की नाही ते माहित नाही असंही पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलं आहे.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in