विधान परिषदेचा निकाल लटकला, राज्यसभा निवडणुकीप्रमाणेच हाय व्होल्टेज ड्रामा
मुंबई: विधान परिषद निवडणुकीसाठी मतदान काही वेळापूर्वीच पार पडलं आहे. मात्र, राज्यसभा निवडणुकीप्रमाणेच या निवडणुकीचा निकाल देखील लांबणीवर पडणार आहे. कारण काँग्रेसने भाजपच्या दोन मतांवर आक्षेप घेतला आहे. राज्यसभा निवडणुकीचा निकाल हा दुसऱ्या दिवशी पहाटे 3 जाहीर करण्यात आला होता. कारण यावेळी मतदान प्रक्रियेत दोन्ही बाजूकडून आक्षेप घेण्यात आले होते. त्यामुळे हे प्रकरण थेट केंद्रीय […]
ADVERTISEMENT

मुंबई: विधान परिषद निवडणुकीसाठी मतदान काही वेळापूर्वीच पार पडलं आहे. मात्र, राज्यसभा निवडणुकीप्रमाणेच या निवडणुकीचा निकाल देखील लांबणीवर पडणार आहे. कारण काँग्रेसने भाजपच्या दोन मतांवर आक्षेप घेतला आहे. राज्यसभा निवडणुकीचा निकाल हा दुसऱ्या दिवशी पहाटे 3 जाहीर करण्यात आला होता. कारण यावेळी मतदान प्रक्रियेत दोन्ही बाजूकडून आक्षेप घेण्यात आले होते. त्यामुळे हे प्रकरण थेट केंद्रीय निवडणूक आयोगापर्यंत गेलं होतं. आज (20 जून) पार पडलेल्या विधानपरिषद निवडणुकीचा निकाल देखील अशाच पद्धतीने लांबण्याची शक्यता आता वर्तवली जात आहे.
भाजपच्या लक्ष्मण जगताप आणि मुक्ता टिळक यांच्या मतदानावर काँग्रेसने आक्षेप घेतला आहे. सुरुवातीला हे याबाबतचं पत्र राज्य निवडणूक आयोगाला देण्यात आलं होतं. मात्र, आता हे पत्र केंद्रीय निवडणूक आयोगाला देण्यात आलं आहे. काँग्रेसने या आक्षेप पत्रात असं नमूद करण्यात आलं आहे की, जगताप आणि टिळक या दोन्ही आमदारांच्या वतीने त्यांच्या सहकाऱ्यांनी मतदान केलं आणि मतपत्रिका बॅलेट पेपरमध्ये टाकली. त्यामुळे त्यांचं मत बाद ठरविण्यात यावं.
मत प्रक्रियेचं उल्लंघन झाल्याने ही मतं रद्द करावी असा आक्षेप घेणारं पत्र काँग्रेसने रिटर्निंग ऑफिसरला दिलं होतं. त्यानंतर आता हे पत्र केंद्रीय निवडणूक आयोगाला देण्यात आलं आहे. त्यामुळे याबाबत नेमका काय निर्णय घेतला जाणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. दरम्यान, या सगळ्या प्रक्रियेमुळे या निवडणुकीचा निकाल लांबण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
नवाब मलिक, अनिल देशमुख यांना परवानगी नाहीच; सर्वोच्च न्यायालय काय म्हणाले?