Nana Patole Exclusive : पटोलेंचा राष्ट्रवादीवर संशय… पवारांवर काय म्हणाले?

मुंबई तक

मुंबई : शिवसेनेतील फुटीनंतर सर्वात जास्त चर्चा झाली ती विधानसभा अध्यक्षांच्या भूमिकेची. काँग्रेसचे विद्यमान प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्ष पदाची खुर्ची सोडल्यानंतर त्यांच्यावर शिवसेना (UBT) आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधून बरीच टीका झाली. नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्षपदाची खुर्ची सोडायला नको होती, असं म्हणतं त्यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करण्यात आलं होतं. दरम्यान, याच सर्व गोष्टीवर नाना […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

मुंबई : शिवसेनेतील फुटीनंतर सर्वात जास्त चर्चा झाली ती विधानसभा अध्यक्षांच्या भूमिकेची. काँग्रेसचे विद्यमान प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्ष पदाची खुर्ची सोडल्यानंतर त्यांच्यावर शिवसेना (UBT) आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधून बरीच टीका झाली. नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्षपदाची खुर्ची सोडायला नको होती, असं म्हणतं त्यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करण्यात आलं होतं.

दरम्यान, याच सर्व गोष्टीवर नाना पटोले यांनी सविस्तर प्रक्रिया दिली. ‘मुंबई तक’ ला दिलेल्या विशेष मुलाखतीमध्ये त्यांनी या आरोपांवर उत्तर दिलं. तसंच यावेळी त्यांनी राष्ट्रवादीवरही निशाणा साधला आणि काही अंशी संशयही व्यक्त केला.

प्रश्न: तुम्ही काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष होण्यापूर्वीच तुमची कारकीर्द वादग्रस्त ठरली. पवारही म्हणाले की, ठरवलेलं विधानसभा अध्यक्षपद सोडलं. तुम्ही अध्यक्षपदी राहिला असता तर बरं झालं नसतं?

नाना पटोले : पवारांनी काय बोलावं हा त्यांचा प्रश्न आहे. आमच्या पक्षाने जो निर्णय घ्यायचा तो आमचा आहे. त्यांनी उपमुख्यमंत्री कोणाला ठेवायचं, कोणाला मंत्री ठेवायचं हे त्यांनी घेतले. आम्ही सांगू त्याला ते उपमुख्यमंत्री करतील काय? अजित पवारांना काढून जयंत पाटलांना उपमुख्यमंत्री करा म्हटलं असतं तर केलं असतं का?

हे वाचलं का?

    follow whatsapp