"मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या दसरा मेळाव्यातील भाषणाची स्क्रिप्ट भाजप-RSS लिखित", राष्ट्रवादीचा आरोप

जाणून घ्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी नेमकी काय टीका केली आहे?
Dasara Melava Eknath Shinde Speech Was Scripted by BJP And RSS Says Amol Mitkari In his Tweets
Dasara Melava Eknath Shinde Speech Was Scripted by BJP And RSS Says Amol Mitkari In his Tweets

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जो दसरा मेळावा मुंबईतल्या बीकेसी येथील मैदानावर घेतला त्या मेळाव्यात त्यांनी उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्यातील भाषणाला प्रत्युत्तर दिलं. तसंच आमचा उल्लेख गद्दार-गद्दार असा करता खरी गद्दारी २०१९ ला झाली आहे. उद्धव ठाकरे हे जेव्हा काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत गेले त्यावेळी त्यांनी गद्दारी केली आहे असा उल्लेखही एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या भाषणात केला. त्यानंतर आता विविध प्रतिक्रिया समोर येत आहेत. महाविकास आघाडीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भाषणावर टीका करायला सुरूवात केली आहे. अमोल मिटकरी यांनीही टीका केली आहे.

Dasara Melava Eknath Shinde Speech Was Scripted by BJP And RSS Says Amol Mitkari In his Tweets
आम्ही गद्दार नाही तुम्हीच गद्दार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं उद्धव ठाकरेंना खणखणीत प्रत्युत्तर

अमोल मिटकरी यांची टीका

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी दोन ट्विट करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भाषणावर जोरदार टीका केली आहे. एकनाथ शिंदे यांच्या भाषणाचं स्क्रिप्ट भाजप आणि संघाने लिहून दिलं आहे असा आरोपच अमोल मिटकरी यांनी केला आहे. एकीकडे अजित पवारांनीही वेदांता आणि फॉक्सकॉनवरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे खोटं बोलत आहेत असा आरोप केला आहे अशात अमोल मिटकरी यांनीही गंभीर आरोप केला आहे.

Dasara Melava Eknath Shinde Speech Was Scripted by BJP And RSS Says Amol Mitkari In his Tweets
Dasara Melava: आम्ही कायदा पाळायचा आणि तुम्ही डुकरं? उद्धव ठाकरेंचा फडणवीसांना सवाल

काय म्हटलं आहे अमोल मिटकरी यांनी?

माननीय मुख्यमंत्री महोदयांचे आजचे BKC मैदानावरील भाषण म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व भारतीय जनता पार्टीने लिहून दिलेली स्क्रिप्ट . या भाषणात नरेंद्रजी मोदी ,RSS आणि भारतीय जनता पार्टीवर स्तुती सुमने तर राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि शिवसेनेवर आगपाखड त्यापलीकडे काहीच नाही. एक मात्र खरे की दसरा मेळाव्याच्या निमित्ताने भाजपाचा "केमिकललोच्या" झाला. ना शिंदे गटाच्या मेळाव्यात स्थान, ना पंकजा मुंडे यांच्या मेळाव्यात, ना शिवतीर्थावर.. भाजपरूपी इतरांची घरे फोडणारा दशासान भविष्यात असाच मातीत मिसळणार हे नक्की.

शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर दोन दसरा मेळावे

शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर पहिल्यांदाच दसऱ्याच्या दिवशी दोन मेळावे पाहण्यास मिळाले. उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या मेळाव्यात एकनाथ शिंदे आणि शिंदे गटावर जोरदार टीका केली. तर दुसरीकडे एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंच्या प्रत्येक आरोपाला प्रत्युत्तर दिलं. एकनाथ शिंदे यांचं भाषण लांबलं होतं. आता एकनाथ शिंदे यांच्या भाषणावर महाविकास आघाडीकडून टीका सुरू झाली आहे तर दुसरीकडे भाजपच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंच्या भाषणावर टीका केली आहे.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in