‘जलयुक्त शिवार’ची चौकशी बंद करणार : देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
पुणे : उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील महाविकास आघाडी सरकारने सुरु केलेली जलयुक्त शिवार योजनेची चौकशी बंद करण्यात येणार आहे. शनिवारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही घोषणा केली. जलयुक्त शिवारच्या ज्या कामांमध्ये गडबड नाही व केवळ राजकीय दृष्टीकोनातून प्रेरित होऊन चौकशा केल्या जात होत्या त्या सर्व कामांची चौकशी बंद केली जाणार आहे. पण जेथे चुकीचे झाले […]
ADVERTISEMENT

पुणे : उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील महाविकास आघाडी सरकारने सुरु केलेली जलयुक्त शिवार योजनेची चौकशी बंद करण्यात येणार आहे. शनिवारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही घोषणा केली. जलयुक्त शिवारच्या ज्या कामांमध्ये गडबड नाही व केवळ राजकीय दृष्टीकोनातून प्रेरित होऊन चौकशा केल्या जात होत्या त्या सर्व कामांची चौकशी बंद केली जाणार आहे. पण जेथे चुकीचे झाले आहे तिथली चौकशी सुरू राहील, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले.
देवेंद्र फडणवीस हे शनिवारी विविध कार्यक्रमांसाठी पुण्यात आले होते. त्यावेळी पत्रकारांशी संवाद साधला. राज्यात सत्तांतर झाल्यानंतर अजित पवार यांनी या चौकशीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. त्यावर प्रश्न विचारला असताना फडणवीस यांनी ज्या कामांमध्ये गडबड नाही व केवळ राजकीय दृष्टीकोनातून प्रेरित होऊन चौकशा केल्या जात होत्या त्या सर्व कामांची चौकशी बंद केली जाणार असल्याचे सांगत आपली भूमिका स्पष्ट केली. मात्र संशय असलेल्या ठिकाणची चौकशी सुरु राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.
आदित्य ठाकरे आणि अजित पवारांवर निशाणा :
यावेळी बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी माजी मंत्री आदित्य ठाकरे, विरोधी पक्षनेते अजित पवार आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर निशाणा साधला. आदित्य ठाकरे महाराष्ट्राची तुलना पाकिस्तानशी करतात हे तर आश्चर्य वाटण्यासारखं आहे असं म्हणत फडणवीस यांनी आदित्य ठाकरेंना टोला लगावला.
तर अद्याप राज्यातल्या १२ ते १५ मंत्र्यांनी पदभारच स्वीकारलेला नाही असा आरोप अजित पवारांनी केला. त्याबाबत विचारण्यात आलं असता देवेंद्र फडणवीस म्हणाले, “अजित पवार यांच्याकडे खूप वेळ आहे. ते आरोप करत बसतील मी उत्तर द्यायचं असं थोडंच आहे? त्यामुळे मी याबाबत काही बोलणार नाही” असं म्हणत फडणवीस यांनी आपल्या खास खोचक शैलीत पवारांना उत्तर दिलं.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असंही म्हणाले की विरोधकांना कुठलीही माहिती नसते. माहिती न घेता ते बोलत असतात. ज्यांना माहिती नाही अशा आरोपांना मी काय उत्तर देणार?. फॉक्सकॉनबाबत जे काही आरोप केले जात आहेत त्याबाबतही देवेंद्र फडणवीस म्हणाले की मी कालच याचं सविस्तर उत्तर दिलं आहे. त्यावर रोज काय बोलायचं?