सांगली साधू मारहाण प्रकरण, देवेंद्र फडणवीसांचा थेट रशियाहून पोलीस महासंचालकांना फोन
सांगलीच्या साधू मारहाण प्रकरणाची बातमी समजताच महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थेट राज्याच्या पोलीस महासंचालकांना फोन केला. रशियावरून संपर्क साधत देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणी माहिती घेतली आणि या घटनेची चौकशी करण्याचे निर्देश पोलीस महासंचालकांना दिले आहेत. काय आहे प्रकरण? सांगलीतल्या जत तालुक्यातल्या लवंगा गावात राहणाऱ्या चार साधूंना मारहाण करण्यात आली. हे साधू […]
ADVERTISEMENT

सांगलीच्या साधू मारहाण प्रकरणाची बातमी समजताच महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थेट राज्याच्या पोलीस महासंचालकांना फोन केला. रशियावरून संपर्क साधत देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणी माहिती घेतली आणि या घटनेची चौकशी करण्याचे निर्देश पोलीस महासंचालकांना दिले आहेत.
काय आहे प्रकरण?
सांगलीतल्या जत तालुक्यातल्या लवंगा गावात राहणाऱ्या चार साधूंना मारहाण करण्यात आली. हे साधू म्हणजे मुलं चोरणारी टोळी असल्याचा संशय आल्यावरून हा प्रकार घडला. यामुळे मोठी खळबळ उडाली. महाराष्ट्राच्या राजकारणातही याचे पडसाद उमटलेले पाहण्यास मिळाले. या घटनेची माहिती मिळताच देवेंद्र फडणवीस यांनी थेट रशियाहून पोलीस महासंचालकांना फोनवरून संपर्क साधला. देवेंद्र फडणवीस हे लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या मॉस्कोतील पुतळ्याच्या अनावरणासाठी तिथे गेले आहेत. त्यांना जेव्हा ही बाब समजली तेव्हा त्यांनी रशियाहून पोलिसांना फोन केला.
मारहाणीच्या प्रकारावर पोलिसांचं काय म्हणणं?
जतच्या उमदी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना उघडकीस येताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्यांनी सर्व माहिती घेतली आणि नंतर कळले की, हे सगळे साधू मथुरा, उत्तर प्रदेश येथील पंच दशनाम पुराण आखाड्याचे महामंडलेश्वर श्री श्री गर्वागिरी महाराज आणि कर्नाटकात तीर्थयात्रेसाठी गेलेले त्यांचे शिष्य आहेत. ते विजापूरहून पंढरपूरच्या दिशेने विठ्ठल दर्शनासाठी जात होते आणि ते ऋषी असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यांची आधारकार्डही तपासण्यात आली आणि त्यांच्या नातेवाईकांशीही पोलिसांकडून बोलणे झाले आहे. आतापर्यंत या साधूंनी कोणतीही तक्रार नोंदवलेली नाही.
Sangali: मुलं चोरणारी टोळी समजून ऋषींना जबर मारहाण, पालघर घटनेची पुनरावृत्ती टळली