‘मी साधुसंत नाही, तर…’, ठाकरेंचा उल्लेख, देवेंद्र फडणवीसांनी काय सांगितलं?
उपमुख्यमंत्री तथा भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांना लक्ष्य केले. उद्धव ठाकरेंनी धोका दिल्याने प्रत्युत्तर द्यावे लागले, असे ते म्हणाले.
ADVERTISEMENT

Devendra Fadnavis vs Uddhav Thackeray : ‘मी वैयक्तिक पातळीवर कायमच नैतिकता ठेवून राजकारण करण्याचा प्रयत्न करतो. पण, राजकारण करताना जिवंत राहिलो, तर नैतिकता ठेवता येते”, असं सांगत देवेंद्र फडणवीस यांनी गेल्या काही महिन्यांत झालेल्या राजकारणाबद्दल रोखठोक भूमिका मांडलीये. लोकसत्ता दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत बोलताना उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना लक्ष्य केले. (Devendra Fadnavis says Uddhav Thackeray backstab to him)
“मी 80 ते 90 टक्के नैतिकतेनेचे राजकारण केले आहे. आदर्शवादी बनून कोणी पाठीत वार केला, तर काय करणार? जनतेने निवडून देऊनही उद्धव ठाकरे चुकीचे वागले. मी साधुसंत नाही, राजकारणी नाही आहे. कोणी असे वागले, तर त्याला प्रत्युत्तर द्यावेच लागते. पण काँग्रेस, एमआयएम यांच्या विचारधारांबरोबर आम्ही जाऊ शकणार नाही”, असं म्हणत फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना काँग्रेससोबत केलेल्या हातमिळवणीवरून अप्रत्यक्षपणे टोला लगावला.
माझ्यावरच अन्याय झाला…
उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाबद्दल बोलताना फडणवीसांनी चिमटा काढला. ते म्हणाले, “उद्धव ठाकरेंना सुरुवातीला जनतेची सहानुभूती होती. पण, आता ती जात आहे. ते कार्यकर्त्यांना व नेत्यांनाही भेटत नाहीत. त्यांच्यावर नाही, माझ्यावरच अन्याय झाला आहे.”
पुढचा मुख्यमंत्री भाजप ठरवेल
राज्यात 2024 च्या विधानसभा निवडणुकीची जोरात तयारी सुरू झाली आहे. विविध राजकीय पक्षांकडून स्थानिक पातळीवर पक्ष विस्तार आणि मतदारसंघांची बांधणी केली जात आहे. त्यातच पुन्हा भाजप-शिवसेना युतीच्या सरकारला जनादेश मिळाला तर मुख्यमंत्री कोण असेल? असा प्रश्न भाजप-शिवसेना युतीच्या राज्यातील नेतृत्वाला केला जात आहे.