एकनाथ शिंदे घेणार मुख्यमंत्रीपदाची शपथ; राजभवनात सोहळ्याची तयारी

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

विधान परिषद निवडणुकीच्या निकालानंतर शिवसेनेविरोधात बंडाचा झेंडा फडकावणारे एकनाथ शिंदे दहा दिवसानंतर मुंबईत दाखल झाले. मुंबईत येताच एकनाथ शिंदेंनी डिवचलं. विमानतळावर उतरल्यानंतर शिंदेंनी देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली आणि आता दोन्ही नेते राजभवनात पोहोचले आहेत.

महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याची मागणी करत शिवसेनेतील ३९ आमदारांनी बंडखोरी केली. गेल्या दहा दिवसांपासून हे आमदार राज्याच्या बाहेर आहेत. बुधवारी सर्व आमदार गुवाहाटीतून गोव्यात दाखल झाले. तेव्हा राज्यातील ठाकरे सरकार कोसळलं.

देवेंद्र फडणवीसांच्या मंत्रिमंडळात शिंदे गटातील १२ जणांना मिळू शकते संधी; कसं असेल नवं मंत्रिमंडळ?

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिल्यानंतर आज एकनाथ शिंदे मुंबईत दाखल झाले. मुंबई विमानतळावर आल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी आदित्य ठाकरेंचा मतदारसंघ असलेल्या वरळीमागे एकनाथ शिंदे पोहोचले ते थेट विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर.

सागर बंगल्यावर आशिष शेलार यांनी एकनाथ शिंदे यांचं स्वागत केलं. त्यानंतर देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांची भेट झाली. त्यानंतर दोन्ही नेते राजभवनात दाखल झाले. दोन्ही नेते राज्यपालांना भेटले आहेत.

ADVERTISEMENT

एकनाथ शिंदेंची भाजपसोबत मैत्री अनेक दिवसांची; खडसेंचा गौप्यस्फोट, गुलाबराव पाटलांवरही टिकास्त्र

ADVERTISEMENT

दोन्ही नेत्यांनी राज्यपालांची भेट घेतल्यानंतर सरकार कधी स्थापन होणार हा प्रश्न निकाली निघाला आहे. सायंकाळी सात वाजता देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे हे शपथ घेणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्रीपदाची, तर एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत.

एकनाथ शिंदेंनी आदित्य ठाकरेंना डिवचलं?

आमदारांनी शिवसेनेविरोधात बंड केल्यानंतर युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी आक्रमक पवित्रा घेत आव्हान दिलं होतं. जेव्हा तुम्ही मुंबईत विमानतळावर उतराल तेव्हा माझ्याच वरळी मतदारसंघातून विधानभवनाकडे रस्ता जातो, असा इशारा आदित्य ठाकरेंनी दिला होता.

“उद्धव ठाकरेंनी हे आधीच सांगितलं असतं, तर बाहेरून पाठिंबा देण्याची आमची तयारी होती”

बहुमत चाचणीवेळी हे आमदार येणार होते. मात्र, बहुमत चाचणी रद्द झाली. असं असलं तरी शपथविधीसाठी एकनाथ शिंदे हे मुंबईत दाखल झाले. दाखल झाल्यानंतर शिंदे वरळी मतदारसंघातून सागर बंगल्याकडे गेले. मात्र, जात असताना शिंदे यांनी आव्हानाला प्रत्युत्तर दिलं. एकनाथ शिंदेंनी एक व्हिडीओ ट्विट केला असून, त्यात ते गाडीच्या दरवाजात उभं राहून समर्थकांना हात उंचावताना दिसत आहे.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT