“सत्तेत असताना कधी शेतकऱ्यांच्या बांधावर गेलात का?” उद्धव ठाकरेंवर दीपक केसरकरांची टीका

मुंबई तक

उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे औरंगाबाद जिल्हा दौऱ्यावर असताना त्यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन नुकसान झालेल्या पिकांची पाहणी केली होती. यावर शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी टीका केली आहे. सत्तेत असताना शेतकऱ्यांच्या बांधावर कधी गेलात का? असा सवाल केसरकरांनी उपस्थित केला आहे. केसरकरांची उद्धव ठाकरेंवर टीका पुढे बोलताना दीपक केसरकर यांनी उद्धव ठाकरे […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे औरंगाबाद जिल्हा दौऱ्यावर असताना त्यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन नुकसान झालेल्या पिकांची पाहणी केली होती. यावर शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी टीका केली आहे. सत्तेत असताना शेतकऱ्यांच्या बांधावर कधी गेलात का? असा सवाल केसरकरांनी उपस्थित केला आहे.

केसरकरांची उद्धव ठाकरेंवर टीका

पुढे बोलताना दीपक केसरकर यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. ते म्हणाले, सत्तेत असताना कुठलेच निर्णय घेतले नाहीत, आता पंचनामे लवकर होत आहेत, नुकसान भरपाई दुप्पट मिळत आहे. हे यापूर्वी का होऊ शकलं नाही, अशी खोचक टीका केसरकरांनी उद्धव ठाकरेंवर केली आहे.

उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना कुठलीच योजना राबवली गेली नाही

बाळासाहेबांची इच्छा होती की, शेतकऱ्यांना मोफत वीज मिळावी, मात्र उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना कुठलीच योजना राबवली गेली नाही. केवळ लोकांची मतं मिळावी यासाठी राजकारण करणं योग्य नाही. तर लोकांसाठी काहीतरी करण्याची इच्छाशक्ती लागते, असं केसरकर म्हणाले. उद्धव ठाकरे यांचं आज पक्षाच्या सहानुभूतीसाठी सगळं काही चाललं आहे. हेच जर जनतेसाठी केलं असतं तर त्यांना अशी फिरायची वेळ आली नसती, असा दावा दीपक केसरकर यांनी केला आहे.

केसरकर म्हणतात, गरीब जनतेसाठी उद्धव ठाकरे बाहेर पडतायेत याचा आनंद

सत्ता नाही म्हणून कोणाला हिणवनं योग्य नाही, मात्र सत्ता असताना कामं केली पाहिजे. आणि कामं करणारं शिंदे आणि फडणवीस सरकार आहे, म्हणून आमचं सरकार चालतं, आमचा पक्ष चालतोय. का तर आम्ही बाळासाहेबांच्या विचारांवर चालत आहोत.आतापर्यंत पक्षासाठी बाहेर पडत होते, मात्र आता पहिल्यांदाच गरीब जनतेसाठी बाहेर पडले आणि त्यांच्यासाठी नुकसान भरपाईची मागणी केली, याचा मला आनंद आहे, असं देखील दीपक केसरकर म्हणाले.

हे वाचलं का?

    follow whatsapp