एकनाथ शिंदे-देवेंद्र फडणवीस यांचा ‘रात्रीस राजकीय खेळ’?; पहाटे २ ते ४ दरम्यान गुजरातला काय घडलं?

मुंबई तक

एकनाथ शिंदे यांनी यांनी जे बंड राज्यात पुकारलं आहे, त्यामुळे महाराष्ट्राचं राजकारण ढवळून निघालं आहे. अशात आता एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांची वडोदरा या ठिकाणी भेट झाली आहे असं कळतं आहे. मुंबई तकच्या हाती ही एक्सक्लुझिव्ह माहिती समोर आली आहे. पहाटे अडीच ते चार या वेळेत देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे या दोघांची भेट […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

एकनाथ शिंदे यांनी यांनी जे बंड राज्यात पुकारलं आहे, त्यामुळे महाराष्ट्राचं राजकारण ढवळून निघालं आहे. अशात आता एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांची वडोदरा या ठिकाणी भेट झाली आहे असं कळतं आहे. मुंबई तकच्या हाती ही एक्सक्लुझिव्ह माहिती समोर आली आहे.

पहाटे अडीच ते चार या वेळेत देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे या दोघांची भेट झाली आहे. एकनाथ शिंदे यांचं बंड झाल्यानंतर पहिल्यांदाच हा संदर्भ समोर येतो आहे. देवेंद्र फडणवीस मुंबईहून वडोदऱ्याला गेले होते. तसंच एकनाथ शिंदे हे आधी दिल्लीला गेले त्यानंतर दिल्लीहून वडोदऱ्याला गेले होते. आधी गुवाहाटीहून दिल्लीत एकनाथ शिंदे गेले होते आणि मग ते वडोदऱ्याला गेले होते अशी माहिती मिळते आहे.

Arvind Sawant : एकनाथ शिंदे आणि बंडखोरांनी शिवसेनेचे दरवाजे स्वतःसाठी बंद केले आहेत

भाजपच्या देवेंद्र फडणवीस यांच्याशी एकनाथ शिंदे यांनी भेट घेतल्याचं कळतं आहे. एकनाथ शिंदे यांच्या बंडामागे भाजप आहे हा आरोप मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केला होता. अशात देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या भेटीची माहिती समोर येते आहे.

महाराष्ट्रातलं राजकारण हे ढवळून निघालं आहे, अशात हे सगळे नेते आधी गुजरातला आणि मग आसामला गेले. ही दोन्ही राज्यं भाजपशासित आहेत. त्यामुळेच या बंडामागे भाजप आहे हे बोललं गेलं होतं. तसंच उद्धव ठाकरे यांनीही हा आरोप केला. तर चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेत काय चाललं आहे त्यात भाजपचा काही संबंध नाही असंही म्हटलं होतं. अशात अत्यंत महत्वाच्या टायमिंगवर ही माहिती समोर आली आहे.

एकनाथ शिंदे यांचं बंड कुठल्या दिशेने जाणार? काय आहेत सात शक्यता?

एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांची पहाटे अडीच ते चार या वेळेत भेट झाल्याची माहिती समोर आली आहे. या भेटीत आता नेमकी काय चर्चा झाली? ते समजू शकलेलं नाही. मात्र या दोघांची भेट आणि त्यात काय चर्चा झाली ते येत्या काही दिवसांमध्ये स्पष्ट होईलच.

महाराष्ट्राच्या राजकारणात २०१९ ला महाविकास आघाडीचा प्रयोग झाला. त्यानंतर आम्ही हे सरकार पाडण्यासाठी काहीही करणार नाही. हे सरकार आपल्या अंतर्विरोधाने कोसळेल असं देवेंद्र फडणवीस यांनी अनेकदा सांगितलं होतं. अशात आधी राज्यसभा निवडणूक आणि त्यानंतर विधान परिषद निवडणुकीत भाजपने बाजी मारली. विधान परिषदेच्या दुसऱ्या दिवसापासून म्हणजेच २१ जूनपासूनच महाराष्ट्रात राजकीय भूकंप झाला आहे. या भूकंपचा हा पाचवा दिवस आहे. रोज राज्याच्या राजकारणात ट्विस्ट येत आहेत. अशात आता ही नवी माहिती समोर आली आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp