चिपळूणसाठी निधीचा शब्द घेवूनच सदानंद चव्हाण यांनी शिंदे गटाला दिला पाठिंबा

भास्कर जाधव यांच्यानंतर चिपळूणमध्ये संपलेली शिवसेना मी उभी केली, असा दावा सदानंद चव्हाण वारंवार करत होते.
Eknath Shinde - Sadanand Chavan
Eknath Shinde - Sadanand ChavanMumbai Tak

रत्नागिरी : चिपळूणचे शिवसेनेचे माजी आमदार सदानंद चव्हाण यांनी अखेरीस पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची साथ सोडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठिंबा जाहीर केला. चव्हाण यांनी बुधवारी उद्योगमंत्री उदय सामंत यांच्यासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेत ठाकरे गटाला धक्का दिला. मागील अनेक दिवसांपासून चव्हाण पक्षनेतृत्वावर नाराज असल्याचे सांगितले जात होते. त्यामुळे ते शिंदे गटात प्रवेश करु शकतात अशी शक्यता वर्तविली जात होती

शिवसेना नेते आणि आमदार भास्कर जाधव यांनी 2004 मध्ये पक्ष सोडल्यानंतर चिपळूणमध्ये संपलेली शिवसेना मी उभी केली, असा दावा सदानंद चव्हाण वारंवार करत होते. 2009 मध्ये त्यांनी चिपळूणमधून विजय मिळवत शिवसेनेचा गड पुन्हा काबीज केला होता. त्यानंतर 2014 सालच्या विधानसभा निवडणुकीतही ते चिपळूणमधून निवडून आले होते. मात्र 2019 मध्ये राष्ट्रवादीच्या शेखर निकम यांच्याकडून सदानंद चव्हाण यांचा पराभव झाला होता.

Eknath Shinde - Sadanand Chavan
अनुष्का शर्माची विराट कोहलीसाठी खास पोस्ट! म्हणाली, "मी नेहमीच..."

त्यानंतर राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर चिपळूण मतदारसंघात शेखर निकम शिवसेनेचे खच्चीकरण करीत असल्याचा आरोप त्यांनी वारंवार केला होते. तसेच वरिष्ठ पातळीवर घेतल्या जात असलेल्या निर्णयावरच त्यांनी आक्षेप घेत नाराजीला वाट करुन दिली होती. एवढेच नव्हे तर अडीच वर्षात पक्षाने बळ दिले नसल्याची खंतही त्यांनी अनेकदा सार्वजनिक व्यासपीठावरुन मांडली होती.

Eknath Shinde - Sadanand Chavan
याकूब मेमनची कबर चर्चेत! पण लादेन, अजमल कसाब आणि अफझल गुरू या दहशतवाद्यांच्या मृतदेहांचं काय झालं?

दरम्यान, या निर्णयाबाबत माध्यमांशी बोलताना सदानंद चव्हाण म्हणाले, गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवर मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. तसेच आगामी काळात चिपळूण मतदारसंघाचा विकास करण्याच्या दृष्टीने त्यांच्याशी चर्चा केली. मतदारसंघासाठी ते निधी देणार असतील, तर माझा त्यांना पाठिंबा आहे, असे मी त्यांच्याशी बोललो आहे. पुढील दोन वर्षांत चिपळूणसाठी जास्तीत जास्त निधी आणून विकासकामे करण्याचा मी प्रयत्न करणार आहे, असेही आश्वासन त्यांनी दिले.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in