गुलाबराव पाटलांविरोधात दोन जिल्ह्यात वातावरण तापलं; बुलढाण्यात तक्रार तर जळगावमध्ये निषेध

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

जळगांव : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटातील नेते आणि पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्याविरोधात दोन जिल्ह्यामध्ये वातावरण तापलं आहे. यात बुलढाणा पोलीस स्थानकात गुलाबराव पाटील हरवल्याची तक्रार करण्यात आली आहे, तर जळगांवमध्ये त्यांच्या एका वादग्रस्त वक्तव्याबाबत निषेध करण्यात आला. तसंच पाण्यासाठी तीव्र आंदोलनही करण्यात आलं.

बुलढाण्यातून गुलबराव पाटील हरवले?

राज्यात शिंदे फडणवीस सरकार स्थापन झाल्यानंतर अनेक दिवस एकाही जिल्ह्याला पालकमंत्री नव्हते. त्यामुळे विविध जिल्ह्यातील कामे ठप्प झाली होती. त्यामुळे जिल्ह्यांना पालकमंत्री द्यावेत, अशी मागणी सर्व स्तरातून होऊ लागली होती. अखेर सप्टेंबर महिन्यात नवीन पालकमंत्र्यांच्या नावाची घोषणा झाली. यात गुलाबराव पाटील यांच्याकडे जळगांवसोबतच बुलढाणा जिल्ह्याचेही पालकमंत्रीपद देण्यात आलं.

मात्र पालकमंत्रीपदी नावाची घोषणा झाल्यापासून गुलाबराव पाटील एकदाही बुलढाण्यात आले नसल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने करण्यात आला. तसंच राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी बुलढाणा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करून, आमच्या पालकमंत्र्यांना तात्काळ शोधून आणावे अशी मागणी केली.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

पालकमंत्रीच गायब असल्याने शेतकरी, शेतमजूर आणि इतरांच्या तक्रारी कोणाकडे मांडायच्या, असा सवाल यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने विचारण्यात आला. त्यामुळे पालकमंत्री कुठेतरी बेपत्ता झाले आहेत, त्यांचा पोलिसांनी तात्काळ शोध घ्यावा अशी मागणी करण्यात येत आहे.

जळगांवमध्ये निषेध :

जळगावमध्ये आज शिवसेनेच्या (ठाकरे गट) वतीने धरणगाव शहरात तीव्र आंदोलन करण्यात आले. यात शिवसेनेचे नेते भास्कर जाधव यांच्या घरावरील हल्ला आणि पाणी पुरवठा संदर्भात पालकमंत्र्यांनी केलेल्या वक्तव्याच्या निषेध करण्यात आला. यावेळी सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ, माजी लोकनियुक्त नगराध्यक्ष निलेश चौधरी यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते.

ADVERTISEMENT

यावेळी शिवसेना सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ म्हणाले, भास्कर जाधव यांच्या घरांवर हल्ला करणे निंदनीय असून गद्दारांच्या पाय खालची वाळू सरकत आहे. तसंच मंत्री गुलाबराव पाटील धरणगावचा पाणीपुरवठा आकाशातून करू का? असे बेताल वक्तव्य करत आहे. पाणीप्रश्नाचे गांभीर्य यांना कळत नाही, खोके घेऊन मस्त झाले आहे, परंतु जनता पाण्याने त्रस्त आहे. यांना नागरिकांच्या संवेदना कळत नाही का? असे संतप्त सवाल आणि टीका त्यांनी केली.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT