अमित शाह मुंबईत आले… महापालिकेसाठी 150 जागांचे टार्गेट सेट करुन गेले…
मुंबई : भाजपच्या प्रत्येक कार्यकर्त्यांने आता मैदानात येणे गरजेचे आहे. हिंदुविरोधी राजकारण आपल्याला संपवायचं आहे. कश्मीर ते कन्याकुमारी पर्यंत भाजपने विस्तार केला आहे. मुंबईच्या राजकारणातही केवळ भाजपचे वर्चस्व राहिले पाहिजे. तुम्ही 135 चे टार्गेट ठेवले आहे. मी 150 नगरसेवक बोलत आहे, असे म्हणतं केंद्रीय गृहमंत्री आणि भाजप नेते अमित शाह यांनी मुंबई महापालिकेवर स्वबळावर आणि […]
ADVERTISEMENT

मुंबई : भाजपच्या प्रत्येक कार्यकर्त्यांने आता मैदानात येणे गरजेचे आहे. हिंदुविरोधी राजकारण आपल्याला संपवायचं आहे. कश्मीर ते कन्याकुमारी पर्यंत भाजपने विस्तार केला आहे. मुंबईच्या राजकारणातही केवळ भाजपचे वर्चस्व राहिले पाहिजे. तुम्ही 135 चे टार्गेट ठेवले आहे. मी 150 नगरसेवक बोलत आहे, असे म्हणतं केंद्रीय गृहमंत्री आणि भाजप नेते अमित शाह यांनी मुंबई महापालिकेवर स्वबळावर आणि अधिकच्या जागांसह सत्ता आणण्याचा निर्धार बोलून दाखविला.
अमित शाह आज मुंबई दौऱ्यावर असुन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर झालेल्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत बोलत होते. यावेळी देवेंद्र फडणवीस यांच्यासह मंत्री गिरीश महाजन, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार आणि इतर जवळपास 200 पदाधिकारी उपस्थित होते.
उद्धव ठाकरे यांनी धोका दिला, त्यांना शिक्षा झालीच पाहिजे :
शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी 2019 च्या निवडणुकानंतर भाजपला धोका दिला. राजकारणात काहीही सहन करा, पण धोका सहन करु नका. उद्धव ठाकरेंना जमीन दाखविण्याची वेळ आली आहे. त्यांना शिक्षा झालीच पाहिजे, असे मोठे वक्तव्य करत अमित शाह यांनी शिवसेनेलाही इशारा दिला.
कानाखाली मारली तर ती शरीराला लागते. मात्र आपल्या घरासमोर कानाखाली मारली, तर तिचा आवाज अंतर्मनापर्यंत जाते. आज ती वेळ आली आहे. उद्धव ठाकरेंनी धोका दिला हे बोलण्यात संकोच नको. राजकारणात धोका दिलेल्यांचे राजकारण यशस्वी होत नाही, असेही अमित शाह म्हणाले.
एकनाथ शिंदे यांचीच खरी शिवसेना :
याशिवाय शिवसेनेवरही शहा यांनी भाष्य केले. ते म्हणाले, शिवसेना स्वतःच्या निर्णयामुळे छोटी झाली. 2014 मध्ये 2 जागांसाठी युती तोडली. मात्र आता एकनाथ शिंदे यांचीच खरी शिवसेना आहे आणि ती आता आपल्यासोबत आहे. असेही शहा म्हणाले.