Raj Thackeray: राज ठाकरेंच्या औरंगाबादच्या सभेबाबत गृहमंत्री वळसे-पाटलांचं मोठं वक्तव्य
मुंबई: मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची औरंगाबादमधील जाहीर सभा होणार की नाही याबाबत सध्या बराच संभ्रम आहे. मात्र आता यविषयी गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी मुंबईतील पत्रकार परिषदेत स्पष्ट केलं की, लवकरच औरंगाबाद पोलीस आयुक्त त्यांच्या जाहीर सभेबाबत निर्णय घेतील. पाहा दिलीप वळसे-पाटील नेमकं काय म्हणाले: ‘मनसेच्या सभेच्या संदर्भात औरंगाबादचे पोलीस आयुक्त एक-दोन दिवसात निर्णय घेतील. ते […]
ADVERTISEMENT

मुंबई: मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची औरंगाबादमधील जाहीर सभा होणार की नाही याबाबत सध्या बराच संभ्रम आहे. मात्र आता यविषयी गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी मुंबईतील पत्रकार परिषदेत स्पष्ट केलं की, लवकरच औरंगाबाद पोलीस आयुक्त त्यांच्या जाहीर सभेबाबत निर्णय घेतील.
पाहा दिलीप वळसे-पाटील नेमकं काय म्हणाले:
‘मनसेच्या सभेच्या संदर्भात औरंगाबादचे पोलीस आयुक्त एक-दोन दिवसात निर्णय घेतील. ते त्यांच्या सहकाऱ्यांशी चर्चा करत आहेत. परिस्थिती पाहून औरंगाबाद आयुक्त योग्य तो निर्णय घेतील.’
‘काल जी सर्वपक्षीय बैठक झाली त्यात बऱ्याच विषयावर चर्चा झाली आहे. आता जर त्यांना जाहीर सभा घ्यायची असेल तर याविषयी काय करायचं ते औरंगाबादचे पोलीस आयुक्त करतील. याबाबत सरकार निर्णय घेणार नाही. जर कायदा-सुव्यवस्था बिघडविण्याचा कोणी प्रयत्न करत असेल तर सरकार नक्कीच कारवाई करेल.’ असंही वळसे-पाटलांनी यावेळी स्पष्ट केलं आहे.