इंदिरा गांधी-शरद पवारांची भेट झाली आणि 48 तासांनंतर पुलोदचं सरकार कोसळलं! काय घडलं होतं?
माझं सरकार कोसळलं तेव्हा मी अस्वस्थ झालो नव्हतो. सकाळी जाऊन मॅच पाहिली. असं शरद पवार म्हणाले होते. गुरूवारीच त्यांनी हे वक्तव्य केलं. नेमकं काय म्हणाले शरद पवार? हे खरं आहे की सत्ता गेल्यानंतर लोक अस्वस्थ होतात. हे काही नवीन भाग नाही. सगळेच काही माझ्यासारखे नसतात. मला आठवतंय की, १९७८-८० मध्ये माझं सरकार बरखास्त केलं गेलं. […]
ADVERTISEMENT

माझं सरकार कोसळलं तेव्हा मी अस्वस्थ झालो नव्हतो. सकाळी जाऊन मॅच पाहिली. असं शरद पवार म्हणाले होते. गुरूवारीच त्यांनी हे वक्तव्य केलं.
नेमकं काय म्हणाले शरद पवार?
हे खरं आहे की सत्ता गेल्यानंतर लोक अस्वस्थ होतात. हे काही नवीन भाग नाही. सगळेच काही माझ्यासारखे नसतात. मला आठवतंय की, १९७८-८० मध्ये माझं सरकार बरखास्त केलं गेलं. हे मला मुख्य सचिवांनी रात्री १२.३० वाजता सांगितलं. १२.३० वाजता तीन-चार मित्रांना बोलवलं आणि घरातील सामान आवरायला घेतलं. सकाळी ७ वाजता मी दुसऱ्या जागेत राहायला गेलो. त्या दिवशी इग्लंडविरुद्ध भारताचा सामना होता. मी वानखेडे स्टेडियमवर सामना बघायला गेलो. क्रिकेटचा आनंद घेतला.