Pune MNS: '...म्हणून मी मनसे कार्यालयात जात नाही', वसंत मोरेंच्या या वक्तव्याचा अर्थ काय?

MNS Vasant More: मनसे कार्यालयात जाणं आपल्याला पटत असं वक्तव्य मनसे नेते वसंत मोरे यांनी केलं आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा चर्चेला उधाण आलं आहे.
Pune MNS: '...म्हणून मी मनसे कार्यालयात जात नाही', वसंत मोरेंच्या या वक्तव्याचा अर्थ काय?
i dont go to mns office I dont feel like it what is the meaning of this statement of vasant more

पुणे: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जेव्हापासून मशिदीवरील भोंग्याविरोधात भूमिका घेतली आहे तेव्हापासून मनसेचे पुण्यातील नेते आणि माजी नगरसेवक वसंत मोरे हे काहीसे नाराज आहेत. दोन दिवसांपासून मनसेचं जे भोंग्यांविरोधात आंदोलन सुरु झालं आहे तिथूनही वसंत मोरे गायब असल्याचं पाहायला मिळालं.

आपण बालाजीला गेलो होतो म्हणून पुण्यात नव्हतो असं आज (6 मे) वसंत मोरे यांनी माध्यमांना सांगितलं. पण यावेळी बोलताना त्यांनी एक मोठं वक्तव्य केलं. ज्यामुळे पुन्हा एकदा चर्चेला उधाण आलं आहे.

'..म्हणून मी मनसेच्या कार्यालयात जात नाही'

पक्षात तुमच्याविरोधात कुरघोडी सुरु आहेत का? असा सवाल जेव्हा वसंत मोरे यांना विचारण्यात आला तेव्हा ते म्हणाले की, 'पक्षांतर्गत कुरघोडी या त्याच वेळेस चालू असतात ज्यावेळी पक्ष मोठा होत असतो आणि मला वाटतं आमच्यात थोडेफार मतभेद झाले आहेत. मतभेद आहेत मनभेद झालेले नाही.'

'मी पक्ष कार्यालयात जात नाही कारण की, पहिल्या दिवशी जो कार्यक्रम झाला तो मला खटकला. फटाके वाजवण्याचा.. त्या ठिकाणी जी मिरवणूक काढण्यात आली, पेढे वाटण्यात आले. ते मला पटलं नाही.'

'मला असं वाटतं की जे संपर्क कार्यालय मी स्वत: त्या ठिकाणी थांबून तयार करुन घेतलं. राज साहेबांसाठी एक स्पेशल रुम तयार केली. पण आता तिथे जे काही झालं त्यामुळे तिथे गेल्यानंतर माझं मन मला साथ देत नाही. मी थोडा पहिल्यापासून भावनिक आहे. त्या कार्यालयासोबत माझं भावनिक नातं आहे. पण त्या दिवशी तिथे जो काही प्रकार तिकडे घडला तो प्रकार नको व्हायला हवा होता त्यामुळे मला तिकडे जावंसं वाटत नाही.' असं वसंत मोरे यावेळी म्हणाले.

याआधी मनसेचे शहराध्यक्ष असलेले वसंत मोरे यांनी पक्ष कार्यालयात जाणं बंद केल्यामुळे ते मनसेतच राहणार की पक्ष सोडणार या चर्चेला उधाण आलं आहे. मात्र, आपण पक्ष सोडणार नसल्याचं वसंत मोरे यांनी यावेळी बोलताना सांगितलं.

'एखाद्या लढाईला एखादा सेनापती नसला तर लढाई कोणी काय हरत नाही'

'मी पण एक माणूस आहे मला सुद्धा भावना आहेत. मी दरवर्षी बालाजीला जातो. एखाद्या लढाईला एखादा सेनापती नसला तर लढाई कोणी काय हरत नाही. मला वाटतं माझ्या अनुपस्थितीत सुद्धा मनसैनिक रस्त्यावर होते.'

i dont go to mns office I dont feel like it what is the meaning of this statement of vasant more
Vasant More: 'एखादा सेनापती नसला म्हणून..', बालाजीहून परतल्यावर वसंत मोरेंची पहिली मुलाखत

'माझ्या इथे आरती वैगरे झाली नाही. माझ्या भागातील मुस्लिम बांधवांना मी निवदेन केलं होतं. त्यामुळे माझ्या भागातील नागरिकांनी पहिल्यापासून अजानचा आवाज बंद केलेला आहे. सकाळची अजान होते ती भोंग्यांशिवयाच होते. शहरात या गोष्टी झालेल्या आहेत. मी उपनगरात मोडतो त्यामुळे इथे काही आरती वैगरे झाली नाही.' असंही वसंत मोरे यावेळी म्हणाले.

Related Stories

No stories found.